कोकण

तुमच्याकडे गोळ्या असतील तर आम्हाला घाला 

सकाळवृत्तसेवा

राजापूर - आज आम्ही पोलिसांना सांगितले तुमच्याकडे गोळ्या असतील तर घाला. तुम्हाला दोन वेळा निवडून दिले. शिवसेनेचे आमदार, खासदार असताना आमच्यावर ही वेळ आली. आम्ही हेच भोगायचे का, अशा शब्दात आमदार राजन साळवी यांच्यावर प्रकल्पग्रस्तांनी प्रश्‍नांचा भडीमार केला.

आपल्या व्यथांना वाट करून देताना आंदोलकांनी उद्धव ठाकरे, शिवसेना आणि लोकप्रतिनिधी या साऱ्यांना जाणीव करून दिली. आम्ही इंग्रजांच्या काळात आहोत का, असा प्रश्‍नही विचारताच आमदार साळवी निरुत्तर झालेले दिसतात. हा सारा प्रसंग व्हिडिओद्वारे पहायला मिळतो आहे. हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. 

व्हिडीओमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या भेटीला गेलेले आमदार श्री.साळवी यांना प्रकल्पग्रस्तांनी शिवसेनेच्या भूमिकेबाबत जाब विचारला. उद्धव ठाकरे येऊन जमीन मोजणी होणार नाही, असे सांगुन गेले. तरी हे काय सुरू आहे, असे विचारता साळवी यांनी मोजणी थांबविणे माझ्या हातात आहे का? असा प्रश्‍न केला. तेव्हा तुम्ही लोकप्रतिनिधी असुन आमच्याबरोबर नाही, म्हाताऱ्या कोताऱ्या दिवसभर उपाशी आहेत. 

राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या स्वाक्षरीने रिफायनरी प्रकल्पाला मंजूरी मिळालेली असताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रकल्पग्रस्तांच्या प्रकल्पविरोधी भूमिकेला पाठिंबा दिला आहे. शिवसेनेच्या या दुटप्पी भूमिकेबाबत प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजी असून त्यातून निर्माण झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या रोषाला आमदार राजन साळवी यांना सामोरे जावे लागत आहे. शिवसेनेच्या संदिग्ध भूमिकेबाबत प्रकल्पग्रस्तांकडून आमदार राजन साळवी यांच्यावर विविध प्रश्‍नांचा भडीमार करीत धारेवर धरले जात असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याचीच सर्वत्र चर्चा सुरू आहे. 

रिफायनरीसाठी जमीन मोजणीला शांततेच्या मार्गाने विरोध करीत प्रकल्पग्रस्तांनी सलग पाचव्या दिवशी ते काम रोखून धरले. रिफायनरी प्रकल्पविरोधी शेतकरी, मच्छीमार संघटनेच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्तांनी शांततेच्या मार्गाने जमीन मोजणी होऊ दिली नाही. राज्यामध्ये भाजपाच्या साथीने शिवसेनाही सत्ताधारी आहे. शिवसेनेचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या स्वाक्षरीने रिफायनरी प्रकल्पाला मंजूरी मिळालेली आहे. मात्र, त्याचवेळी शिवसेनेचे आमदार साळवी यांनी प्रकल्पाला विरोध करीत प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी उभे राहणार असे सांगितले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही प्रकल्पग्रस्तांपाठी शिवसेना आहे, असे सांगितले. 

आंदोलनाची दखल कमी 
गेले पाच दिवस जमीन मोजणीच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाची कोणीही फारशी दखल घेतलेली नाही. त्यामुळे आंदोलकांच्या मनात प्रचंड चीड निर्माण झाली. ही चीड साळवी यांच्यासमोर आंदोलनकर्ते कशी व्यक्त करतात याचा व्हिडिओच व्हायलर झाला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: बिश्नोईने दूर केला तुफानी खेळ करणाऱ्या सुनील नारायणचा अडथळा, कोलकाताने गमावली दुसरी विकेट

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

SCROLL FOR NEXT