कोकण

कोकण मराठी साहित्य परिषदेचे वाङ्‌मयीन पुरस्कार जाहीर

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी -  कोकण मराठी साहित्य परिषदेने राजापूर येथील साहित्यिक मानसी हजेरी, लांज्यातील अमोल रेडीज यांच्यासह कोकणातील १४ जणांना वाङ्‌मयीन पुरस्कार जाहीर केले आहेत. 
कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे कोकणातील साहित्यिकांना विविध वाङ्‌मयीन पुरस्कार दिले जातात.

प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराचे स्वरूप पाच हजार रुपये, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, द्वितीय क्रमांकाचे विशेष पुरस्काराचे स्वरूप तीन हजार रुपये, सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह असे आहे. कोमसापचे पुरस्कार समितीचे निमंत्रक अरुण नेरुरकर यांनी या पुरस्कारांची घोषणा आज केली. पुरस्कार वितरण कार्यक्रम कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) येथे २८ जानेवारीला सकाळी १० वाजता कोमसापच्या वार्षिक स्नेहमेळाव्यात होणार आहे.

वाङ्‌मय प्रकार, पुरस्कार, लेखक आणि पुस्तकाचे नाव या क्रमाने - कादंबरी- र. वा. दिघे पुरस्कार- विवेक गोविलकर (युनायटेड आयर्न अँड स्टील), वि. वा. हडप स्मृती विशेष पुरस्कार- गुंजार पाटील (शिवशंभू), कथासंग्रह- वि. सी. गुर्जर स्मृती पुरस्कार- राजश्री बर्वे (चांदण्यांचं झाड), विद्याधर भागवत स्मृती विशेष पुरस्कार- कल्पना बांदेकर (मन पाखरू पाखरू), कविता- आरती प्रभू स्मृती पुरस्कार- वसुंधरा तारकर (बाईमाणसाच्या संज्ञेतून), वसंत सावंत स्मृती विशेष पुरस्कार- नरसिंग इंगळे (शब्दवेणा), चरित्र, आत्मचरित्र- धनंजय कीर स्मृती पुरस्कार- जगन्नाथ वर्तक (हिरवे वाळवंट), श्रीकांत शेट्ये स्मृती विशेष पुरस्कार- भावना पाटोळे (यशवंतराव चव्हाण), समीक्षा- प्रभाकर पाध्ये स्मृती विशेष पुरस्कार- (कै.) डॉ. विद्याधर करंदीकर (कवी, नाटककार स्वा. सावरकर), ललित- अनंत काणेकर स्मृती पुरस्कार- वैभव साटम (बिटकी), सौ. लक्ष्मीबाई व राजाभाऊ गवांदे पुरस्कार- प्रतिभा सराफ (माझी कुणीतरी), बालवाङ्‌मय- प्र. श्री. नेरूरकर स्मृती पुरस्कार- मानसी हजेरी (ससोबाचा चांदोबा), संकीर्ण- वि. कृ. नेरुरकर स्मृती पुरस्कार- डॉ. अविनाश पाटील (आगरी बोली, लोकसंस्कृती आणि साहित्य परंपरा), अरुण आठल्ये स्मृती पुरस्कार- विनोद पितळे (बायलाइन), वैचारिक साहित्य- फादर स्टीफन सुवार्ता वसई पुरस्कार- डॉ. सोमनाथ कदम (मातंग समाजाचा इतिहास), नाटक, एकांकिका- रमेश कीर पुरस्कार- अमोल रेडीज (द गेम ऑफ डेस्टिनी). दृकश्राव्य, कला-सिनेमा या विषयावरील योग्य पुस्तक आले नसल्याने पुरस्कार देण्यात येणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: मागील १० वर्षांमध्ये मोठ्या बाता मारण्यात आल्या. परंतु, तुमच्या आयुष्यात काहीच बदल झाला नाही - प्रियांका गांधी

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT