कोकण

मूकबधिरांचा संवाद पाहून पालकमंत्री अवाक्‌

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - सर्वसामान्य मुलांपेक्षा वेगळी भाषा असणारी मूकबधिर मुले संवाद कसा साधतात, हाताच्या बोटांच्या खुणांनी बोलतात कसे हे समजावून घेताना पालकमंत्री रवींद्र वायकर तासभर रमले. के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालयात बालदिनानिमित्त त्यांनी भेट देऊन मुलांना खाऊचे वाटप केले. विद्यार्थ्यांची हस्तकला पाहून स्तिमित झाले. विद्यार्थ्यांसाठी शासकीय योजना राबविण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

मूकबधिर विद्यार्थ्यांना ऐकू किंवा बोलता येत नसल्याने संवाद साधणे अवघड जाते. त्यामुळे हे विद्यार्थी हाताच्या बोटांच्या माध्यमातून इंग्रजी, मराठी वर्णमाला कशी शिकतात, त्यांना यंत्राच्या साह्याने थोडे ऐकू कसे येते याची माहिती मुख्याध्यापिका अनुराधा ताटके यांनी पालकमंत्र्यांना दिली. हस्तकलेच्या वस्तू, लाकडी, कापडी शोपीस व शोभिवंत वस्तू, शुभेच्छापत्रे आदींचे दिवाळीत प्रदर्शन भरवले जाते असे, दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या सचिव दाक्षायणी बोपर्डीकर यांनी सांगितले. पुढील वर्षी शुभेच्छापत्रे या शाळेतूनच घेऊ, असे वायकर यांनी सांगितले.

पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्म दिनानिमित्त बालदिनी कार्यक्रम साजरे होतात; पण विशेष क्षमता असलेल्या दिव्यांग मुलांना भेटण्याचा कार्यक्रम पालकमंत्र्यांनी आखला. पालकमंत्री वायकर यांनी मतिमंदांसाठी कार्यरत आविष्कार संस्था, विशेष गरजेच्या मुलांसाठी आस्था सोशल फाऊंडेशनचे थेरपी सेंटर आणि बालगृह, निरीक्षणगृहाला भेट दिली. या वेळी तहसीलदार मच्छिंद्र सुकटे, शिवसेना संपर्कमंत्री विजय कदम, समाजकल्याण विभागाचे अधिकारी, डॉ. संतोष बेडेकर, सुधाकर सावंत, दीप्ती भाटकर, सचिन वायंगणकर, शमिन शेरे, शेखर लेले उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT