कोकण

राष्ट्रपती भवनात शिवछत्रपतींच्या प्रतिमेद्वारे कोकणी मुद्रा

मकरंद पटवर्धन

रत्नागिरी - दिल्ली येथील राष्ट्रपती भवनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी शिवरायांची प्रतिमा स्थापन झाली. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना ही प्रतिमा दिली. ही प्रतिमा साकारणारे आंतरराष्ट्रीय चित्रकार महेश लाड यांचे रत्नागिरीत आजोळ आहे. त्यांनी पतितपावन मंदिरात आजोबांवरील प्रेमापोटी चार चित्रे साकारली. 

आजोबा वासुदेव गणपत शिंदे चित्रकार आणि स्वातंत्र्यवीर सावरकरभक्त. १९३१ मध्ये त्यांनी पतितपावन मंदिराच्या स्थापनेवेळी मंदिरात काही चित्रे रेखाटली होती. त्यानंतर या मंदिराचा जीर्णोद्धार २०११ च्या दरम्यान झाला. त्या वेळी नवी चित्रे काढायची होती. तेव्हा महेश लाड यांनी आवर्जून स्वा. सावरकर, कूर्तकोटी महाराज यांच्या प्रतिमा साकारल्या. तसेच भिंतीवर संत गाडगेबाबा, समर्थ रामदास स्वामी यांची चित्रे सुरेख साकारली.

शिवजयंती सोहळ्यात छत्रपतींचे चित्र पाहिल्यावर राष्ट्रपती कोविंद यांनीही समाधान व्यक्त केले. शिवरायांची प्रतिमा राष्ट्रपती भवनाची शोभा वाढवेल, असे उद्‌गारही राष्ट्रपतींनी काढले. या वेळी भारताचे लष्करप्रमुख बिपिन रावत, नौदलप्रमुख ॲडमिरल सुनील लांबा उपस्थित होते.

छत्रपतींचे चित्र राष्ट्रपतींना भेट द्यायचंय म्हटल्यावर त्या चित्राच्या सत्यतेवर भर देणं भाग होते. त्याबाबत खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याशी चर्चा केल्यानंतर ब्रिटिश लायब्ररीमध्ये महाराजांचे जे एकमेव पोर्ट्रेट आहे, त्याची निवड करायचे ठरवले. राष्ट्रपतींना भेट दिलेल्या महाराजांच्या प्रतिमेत सोन्याचे कण मढवण्यात आलेत, म्हणजे ही प्रतिमा सुवर्णजडित आहे. यात काही इतर उच्च दर्जाच्या स्टोन्सचाही वापर करण्यात आल्याचे लाड यांनी सांगितले.

राष्ट्रपती भवनातील चित्राने माझ्या कलेचे चीज झाले. आमचे पूर्वज महाराजांच्या दरबारी होते, आज आपल्यालाही तो मान मिळाला, केवळ या एका भावनेनं सगळं कुटुंब समाधानी आहे. आजोबा वासुदेव गणपत शिंदे यांनी रेखाटलेली चित्रे सयाजीराव गायकवाड महाराजांच्या दरबारी होती. आजोबांप्रमाणे आज आम्हालाही मान मिळाला, या भावनेने कुटुंब समाधानी आहे. आजोबा वासुदेव शिंदे हे स्वा. सावरकर भक्त. त्यामुळे त्यांनी पतितपावन मंदिराच्या स्थापनेवेळी चित्रे रेखाटली. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून पतितपावनच्या जीर्णोद्धारावेळी मीसुद्धा स्वा. सावरकरांचे चित्र रेखाटले. रत्नागिरीशी माझे अतूट नाते आहे.
- महेश लाड

महेश लाड यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. विख्यात चित्रकार असलेल्या या व्यक्तीचे रत्नागिरीशी ऋणानुबंध आहेत. पतितपावन मंदिरात त्यांनी स्वा. सावरकर व आजोबांवरील प्रेमामुळे चित्रे काढली.
- ॲड. बाबा परुळेकर, 

अध्यक्ष, पतितपावन मंदिर संस्था

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिकने जिंकला टॉस! मुंबईकडून 'या' खेळाडूचे पदार्पण, तर हैदराबाद संघातही मोठा बदल; पाहा प्लेइंग-11

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

Disha Patani : दिशाच्या बिकिनी लुकचा सोशल मीडियावर धुमाकूळ; फोटो पाहून नेटकरी म्हणाले...

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT