कोकण

संगमेश्‍वरातील सोनवी नदीपात्रात प्लास्टिकचा खच

सकाळवृत्तसेवा

देवरूख - संगमेश्‍वरातील सोनवी नदीपात्रात प्लास्टिकचा खच पडत असल्याने पाण्याच्या प्रदूषणासह प्लास्टिक निर्मूलनाचा मोठा प्रश्‍न उभा राहिला आहे. नदीपात्रात फिरणारी गुरे हे प्लास्टिक खात असल्याने त्यांच्याही जिवाचा प्रश्‍न असून नावडी ग्रामपंचायतीने यावर उपाय करावा, अशी मागणी निसर्गप्रेमींनी केली आहे.

संगमेश्‍वर बाजारपेठ सोनवी नदीच्या काठावर वसली आहे. जवळपास हनुमान मंदिर ते पावटा मैदान या ठिकाणापर्यंत काठावर दुकाने आहेत. या परिसरात कचरा आणि प्लास्टिक सर्रास या नदीपात्रात फेकले जाते. पावसाळ्यात पाण्याच्या मोठ्या प्रवाहामुळे हा कचरा दिसत नाही, मात्र डिसेंबरनंतर नदीचे पाणी कमी झाल्यावर कचऱ्याचा प्रश्‍न समोर येतो. गेले काही दिवस सोनवी नदीपात्रातील प्लास्टिकचा खच पाहून सखेद आश्‍चर्य व्यक्‍त करण्यात येत आहे. एकीकडे पाण्याची पातळी वाढावी यासाठी बंधारे बांधले जातात, मात्र दुसरीकडे याच पात्रात कचरा आणि प्लास्टिक टाकले जात असल्याने साठलेले पाणी प्रदूषित होते.

परिसरातील मोकाट गुरे दिवसभर पाणी पिण्याच्या निमित्ताने या नदीपात्रात फिरतात. हीच गुरे या प्लास्टिकच्या कचऱ्यावर ताव मारतात. याचा फटका या मुक्‍या जनावरांनाही बसू शकतो. त्यामुळे यावर नावडी ग्रामपंचायतीने काहीतरी उपाय करावा अशी मागणी होत आहे. ग्रामपंचायतीची घंटागाडी बंद असल्याने हॉटेल व्यावसायिकांसह पोल्ट्री, चिकन, मटणाचा ओला कचरा बिनधास्तपणे नदीपात्रात फेकला जातो. याचा फटका पाण्याला बसत आहे. ग्रामपंचायतीने या परिसरात मोठी कचराकुंडी बसवावी आणि त्यातील कचरा नियमित साफ करण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.

‘शास्त्री’च्या पात्रातही कचरा
संगमेश्‍वर बाजारपेठेमागून वाहणाऱ्या शास्त्री नदीपात्रातही कचऱ्याची समस्या गंभीर आहे. हा प्रश्‍न सद्यःस्थितीत फारसा गंभीर दिसत नसला तरी आगामी काळात त्यातून मोठी समस्या उद्‌भवू शकते. त्यामुळे नावडी ग्रामपंचायतीने यावर वेळीच उपाय करण्याची मागणी संगमेश्‍वरवासीयांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'साराभाई' फेम अभिनेत्री करणार भाजपमध्ये प्रवेश!

Sanjay Pandey : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंनी घेतली लोकसभेतून माघार, 'या' नेत्यांमध्ये होणार थेट लढत

Russian Attack Video: रशियाच्या मिसाईल हल्ल्यात 'हॅरी पॉटरचा किल्ला' उद्धवस्त; 5 जणांचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील शाळांना आलेली धमकी पोकळ; घाबरण्याची गरज नाही.. गृह मंत्रालयाची माहिती

KVS Manian: कोटक महिंद्रा बँकेचे सह व्यवस्थापकीय संचालक मनियन यांनी दिला राजीनामा; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT