कोकण

मुख्याध्यापकांनी गिरवलेल्या धड्यातही नाट्य

शिरीष दामले

रत्नागिरी -  व्यासपीठावर आठ ते दहा मुख्याध्यापक. समोरचा प्रेक्षकही मुख्याध्यापक. मुख्याध्यापकांना फुगे देण्यात आले. प्रत्येकाला ते फुगवून घ्यायला सांगितले. हातात एक टाचणी दिली. प्रशिक्षण देणाऱ्यांनी सांगितले की, प्रत्येकाने आपल्या हातातील फुगा अधिक काळ टिकवायचा आहे. मुख्याध्यापकांनी आज्ञापालन सुरू केले. दोन ते तीन बाजूला जाऊन उभे राहिले. उरलेल्यांनी टाचणीचा नामी उपयोग सुरू करून एकमेकाचे फुगे फोडण्यास सुरुवात केली. मुख्याध्यापक खेळात रंगले, नव्हे धडे घेऊ लागले. हळूहळू साऱ्यांचेच फुगे फुटले. विजेता कोण?.... कोणीच नाही.

विद्यार्थ्यांना दिलेल्या सूचना त्यांनी अंमलात आणल्या नाहीत किंवा त्यांना कळल्या नाहीत, तर काय गोंधळ होतो, हा साधा भाग या खेळाद्वारे मुख्याध्यापकांना शिकवण्यात आला. विद्यार्थी बनलेल्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांसारखाच गोंधळ केला. 

आपला फुगा टिकवायचा एवढीच सूचना होती. हातात टाचणी दिलेली, त्यामुळे जणू आपला टिकवायचा म्हणजे दुसऱ्याचा फोडायचा अशा समजुतीत पटापट एकमेकाचे फुगे फोडले गेले. सूचना नीट ऐकली असती, तर हा गोंधळ झाला नसता. पण टाचणी हातात आल्याबरोबर काहीजण सुटले. एका छोट्याशा खेळातून मुख्याध्यापकांना बरेच काही शिकायला मिळाले. हा प्रसंग घडला सावर्डे येथे झालेल्या चिपळूण तालुक्‍याच्या प्रशिक्षणात. जिल्ह्यातील विविध तालुक्‍यांत झालेल्या अशा प्रशिक्षणांतून मुख्याध्यापकांना भरपूर शिकायला मिळाले.

विद्यार्थ्यांना कसे शिकवायचे, याबाबत शिक्षकांचे सातत्याने प्रशिक्षण घेण्यात येते. आता शिक्षकांसह मुख्याध्यापकांचेही प्रशिक्षण सुरू झाले असून नुकतेच जिल्ह्यातील नऊही तालुक्‍यांत मुख्याध्यापकांनी दोन दिवस अविरत प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणादरम्यान मुख्याध्यापकांनाही धडे गिरवण्याची संधी मिळाली. काहींना अद्यापही किती धडे गिरवायला हवे आहेत, याबाबतचा स्वतःचाच अंदाज आला. दोन दिवसांच्या प्रशिक्षणात यामुळे रिफ्रेश व्हायला मिळाले, अशी प्रतिक्रिया व्यक्त झाली. मोहन पाटील व राजेंद्र वारे यांनी रिसोर्स पर्सन म्हणून काम पाहिले.

तेंडूलकरी नाट्याची झलक
विद्यार्थ्यांना सूचना आणि त्याचे पालन यापुरता हा विषय सीमित असला तरी थोडा अधिक मानसिकतेचा विचार केला, तर तेथे तेंडूलकर यांच्यासारख्याच्या नाटकातील हिंसक प्रवृत्तीचे नाट्य बघायला मिळाले. आपला फुगा टिकवायचा याचा अर्थ दुसऱ्याचा फोडायचा असे मुळीच नाही. टाचणी हातात मिळाली, त्याबरोबर फुग्यांना टाचणी लावण्याचा आनंदही घेतला. दुसऱ्याचे मोडून काढायचे याचा आनंदही घेतला. अर्थात प्रशिक्षणावरील हे भाष्य म्हणजे फार ताणल्यासारखे वाटू शकेल.

शिक्षकाला क्रियाशील घडविण्याचा प्रयत्न आहे. येथून पुढच्या काळात सर्व प्रशिक्षण ऑनलाईन होणार आहे. वेळ, पैसा, यंत्रणांचा व्याप वाचणार आहे. घरबसल्या सर्व प्रशिक्षणे होणार आहेत. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून फावल्या वेळत प्रशिक्षणे पूर्ण करता येतील. आता तंत्रज्ञानात शिक्षक विद्यार्थ्याच्या पुढेच हवा.
- मोहन पाटील
(साधन व्यक्ती)

अनेक प्रशिक्षणाने शिक्षक मेटाकुटीला येत असताना येथून पुढे प्रशिक्षण ऑनलाईन झाल्यामुळे सर्व शिक्षकांनी या प्रशिक्षणाचे स्वागत करून मुख्याध्यापकांनी आनंदाने प्रशिक्षण घेतले.
- विनोद फणसे,

प्रशिक्षणार्थी मुख्याध्यापक, खेर्डी हायस्कूल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT