बारसू सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटना यांच्यावतीने शासनाला निवेदन देण्यात आले. sakal
कोकण

रत्नागिरी : एकच जिद्द ..रिफायनरी रद्द

आज रिफायनरी प्रकल्प विरोधकांनी भव्य मोर्चा

सकाळ वृत्तसेवा

राजापूर : रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विशेषतः राजापूर तालुक्यामध्ये रिफायनरी प्रकल्प उभारण्याचा हालचाली शासन स्तरावरून सुरू असताना आज रिफायनरी प्रकल्प विरोधकांनी भव्य मोर्चा काढून रिफायवरी प्रकल्प रद्द झालाच पाहीजे अशी जोरदार मागणी केली. शहरातील कोदवली नदीपात्रातील खर्लीपात्र ते तहसिलदार कार्यालय अशा काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये ‘जमीन आमच्या हक्काची..नाही कुणाच्या बापाची’,‘ एकच जिद्द ..रिफायनरी रद्द,, अशा ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी केली.

बारसू सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटना यांच्यावतीने शासनाला निवेदन देण्यात आले. त्यामध्ये बारसू-सोलगाव-धोपेश्‍वर पंचक्रोशीमध्ये प्रदूषणकारी प्रकल्प प्रस्तावित करू नये अशी मागणी केली. तसा प्रकल्प प्रस्तावित केल्यास त्याला ठाम विरोध राहील अशी भूमिकाही त्यांनी यावेळी स्पष्ट केली. हे निवेदन तहसिलदार शितल जाधव यांच्याकडे बारसू सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेचे अध्यक्ष अमोल बोळे, नेते अशोक वालम, सत्यजित चव्हाण यांच्यासह अन्य ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने सुपूर्द केले.

तालुक्यातील धोपेश्‍वर परिसरामध्ये रिफायनरी प्रकल्प उभारण्याच्या शासन स्तरावरून हालचाली सुरू असून तसे संकेतही केंद्र आणि राज्य शासनाकडून देण्यात येत आहे. तर, कोकण दौर्‍यावर असलेले राज्याचे पर्यावरणमंत्री आदीत्य ठाकरे यांनीही प्रकल्प उभारणीच्यादृष्टीने सकारात्मक प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. त्यामुळे राजापूरमध्ये रिफायनरी प्रकल्प होणार असल्याचे संकेत मिळत असताना प्रकल्प विरोधकांसह ग्रामस्थांनी आज जोरदार मोर्चा काढीत प्रकल्पाला ठाम विरोध असल्याचे दाखवून दिले आहे.

खर्ली नदीपात्रातून सुरू झालेल्या या मोर्चामध्ये विविध गावांमधील तरूणांसह महिला, जेष्ठ ग्रामस्थ मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते. खर्ली पात्रातून सुरू झालेला हा मोर्चा सुमारे आठशे-नऊशे किमी.चे अंतर पायी कापून तहसिलदार कार्यालयावर धडकला. यावेळी जवाहरचौकातील छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकालाही मोर्चेकर्‍यांनी अभिवादन केले. तहसिलदार कार्यालयाच्या आवारामध्ये आल्यानंतर मोर्चेकर्‍यांनी एकच गर्दी करीत जोरदार घोषणाबाजी सुरू करीत तहसिलदार कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला. यावेळी मोर्चेकर्‍यांच्या हातामध्ये असलेले ‘पर्यावरण वाचवा रिफायनरी हटवा, ’जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, ’कोकण वाचवा रिफायनरी हटवा’ आदी संदेश देणारे फलक सार्‍यांचे लक्ष वेधून घेत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT