कलाकृतींना चित्रप्रदर्शनात स्थान
कलाकृतींना चित्रप्रदर्शनात स्थान sakal
कोकण

रत्नागिरी: कलाशिक्षकांच्या कलाकृतींना चित्रप्रदर्शनात स्थान

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी: कोरोना महामारीनंतर आता अनोख्या चित्रांची प्रदर्शने भरवण्यात येऊ लागली आहेत. दोन वर्षांच्या टाळेबंदी, निर्बंधांच्या कालखंडात चित्रकारांनी कुंचल्यातून अनेकविध कलाकृती साकारल्या. त्यातील निवडक चित्रांचे प्रदर्शन प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमी आर्ट गॅलरीत शुक्रवारपासून (ता. २२) सुरू होणार आहे. यात रत्नागिरीतील कलाशिक्षक, चित्रकारांच्या चित्रांचा समावेश झाला आहे. या प्रदर्शनात रत्नागिरीचे नीलेश पावसकर (फाटक हायस्कूल), दिगंबर मांडवकर (देवरुख हायस्कूल), रमेश गंधेरे (न्यू इंग्लिश स्कूल सैतवडे), अर्जुन माचिवले (आर. एन. गांधी हायस्कूल, मुंबई) या चार नामांकित कलाकारांच्या अस्सल कोकणी चित्रांचा समावेश आहे. यापूर्वीही या चित्रकारांची चित्रे नामवंत प्रदर्शनात झळकली आहेत.

जागतिक पातळीवरचे चित्रकार लिओनार्दो दा व्हिंची यांच्या जयंतीनिमित्त १० वे आर्ट व्हिजन चित्रकला प्रदर्शन २२ ते २४ एप्रिल या कालावधीत आयोजित केले आहे. २०१२ रत्नागिरी तालुक्यातील तरवळ माचिवलेवाडीचे कलाध्यापक अर्जुन माचिवले व त्यांचे सहकारी महेश कदम, रियाज काझी यांनी आर्ट व्हिजन सुरू केले. गेली १० वर्षे सातत्याने हे कलाप्रदर्शन होत असल्यामुळे आयोजकांमध्ये व प्रामुख्याने रसिक कलाप्रेमी यामध्ये अतिशय उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कलाप्रदर्शनाला महाराष्ट्रातून रत्नागिरी, सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूरसह व मुंबई शहरांतील कलाप्रेमीपासून ते अगदी खेडेगावातील चित्रकार हिरीरीने यामध्ये सहभागी होतात. यावर्षी प्रदर्शनामध्ये नाविन्यता आणण्यासाठी कला शिक्षक, आर्टिस्ट त्याचबरोबर विद्यार्थी, काही निवडक शाळादेखील या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. सहभागी होणाऱ्या सर्व कलाकारांना व शैक्षणिक व सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना व निवडक व्यक्तींना राजा रविवर्मा पुरस्कार देऊन या प्रदर्शनात गौरविण्यात येणार आहे.

अर्जुन माचिवले हे कलाध्यापक असून विद्यार्थ्यांच्या उपजत सुप्त गुणांच्या विकासासाठी तसेच नवोदित कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ते नेहमी मेहनत घेतात. तसेच कलागुणांना योग्य कलापीठ उपलब्ध व्हावे, म्हणून महाराष्ट्रातील निवडक कलाशिक्षकांना एकत्र घेऊन त्यांनी कलाप्रदर्शने भरवली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT