Ratnagiri Politics Loksabha Election Kiran Samant esakal
कोकण

Ratnagiri Politics : राणेंची 'ती' ऑफर धुडकावत सामंतांनी बदलला Whatsapp DP; मशालीच्या 'डीपी'ने राजकीय तर्कांना उधाण

आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी किरण सामंत यांना भाजपमध्ये येण्याचे आवतण दिले आहे.

सकाळ डिजिटल टीम

डीपी ठेवल्यामुळे सामंत-राणे यांच्यात राजकीय संघर्ष पेटणार अशी चर्चा होती.

रत्नागिरी : प्रसिद्ध उद्योजक आणि सिंधुरत्न योजनेचे सदस्य किरण ऊर्फ भैय्या सामंत (Kiran Samant) यांनी त्यांच्या मोबाईलचा डीपी मशाल ठेवल्याने राजकीय वर्तुळात जोरात पतंगबाजी करण्यात आली. ज्याने त्याने आपल्या तर्काचे मनोरे रचले. यामुळे राजकीय संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.

मात्र, याचा रोख कोकणाकडे नव्हे, तर पुणे-बारामतीकडे असल्याची जोरदार चर्चा आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या (Loksabha Election) दाव्यावरून सध्या शिवसेना-भाजपमध्ये रस्सीखेच आहे. भाजपकडून प्रमोद जठार, तर शिवसेनेकडून किरण सामंत यांचे नाव चर्चेत आहे.

यावरून भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी राजकीय वक्तव्य करत किरण सामंत यांना भाजपमध्ये येण्याचे आवतण दिले आहे. या पार्श्वभूमीवर किरण सामंत यांनी मशालीचा डीपी ठेवल्याचा अंदाज मांडला जात आहे. मात्र किरण सामंत यांचा वेगळाच रोख असल्याचीही चर्चा आहे.

डीपी ठेवल्यामुळे सामंत-राणे यांच्यात राजकीय संघर्ष पेटणार अशी चर्चा होती. भाजप-शिवसेनेच्या सत्तेत राष्ट्रवादी कॉंग्रेस सामिल झाल्याचे आधीच शिंदे गटाला रुचले नव्हते. राष्ट्रवादीच्या एन्ट्रीने शिंदे गटाला अनेक स्वप्नांवर पाणी सोडावे लागले. तसेच वाट्याची मंत्रिपदे आणि निधीतील वाटाही कमी झाला.

गेल्या काही दिवसांपासून बारामतीकरांकडून सत्तेत असताना मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप होत असल्याचा प्रचंड रोष शिंदे गटात असल्याची चर्चा आहे. या हस्तक्षेपामुळे शिंदे गटामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. त्याअनुषंगाने किरण सामंत यांनी मशाल डीपी ठेवल्याची चर्चा आहे. त्यामुळे मशालीचा हा रोख कोकणकडे नसून पुण्याकडे आहे, अशीही चर्चा आहे.

शिंदे, फडणवीसांना त्रास नको...

किरण सामंत म्हणाले, स्वतः चे ठेवावे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून, अशी काही लोकांना सवय आहे. मी मात्र तसे करत नाही. मी माझ्या कामाशी प्रामाणिक आहे. मी कधीही खोटे वागत नाही, खोटे बोलत नाही. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीचाच उमेदवार निवडून येणार हे निश्चित आहे. मी डीपी बदलला त्याचे कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्रास होऊ नये. शिंदे यांच्या या वर्षभरातच मी संपर्कात आलो आहे. ते अत्यंत भावनिक आहेत, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

दारुबंदी साठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीचे शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

SCROLL FOR NEXT