Ratnagiri Politics NCP leader Sudesh Mayekar esakal
कोकण

रत्नागिरीच्या राजकारणात लवकरच दिसणार बालमित्रांची जोडी; NCP जिल्हाध्यक्षांचा शिंदे गटातील प्रवेश जवळजवळ निश्चित!

भविष्यातील पालिकेच्या निवडणुकीतील सुदेश मयेकर शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार असण्याची शक्यता आहे.

सकाळ डिजिटल टीम

सुदेश मयेकर यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर पक्षाला वेगळी ऊर्जा मिळाली होती.

रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे पायउतार झालेले जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर (Sudesh Mayekar) यांचा शिवसेनेतील (शिंदे गटात) प्रवेश जवळजवळ निश्चित झाला आहे. किंगमेकर किरण उर्फ भैय्या सामंत यांचा ७ जानेवारी २०२४ ला वाढदिवस असून, या दिवशी सुदेश मयेकर समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

भविष्यातील पालिकेच्या निवडणुकीतील सुदेश मयेकर शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. पक्षनिष्ठेसाठी मित्राचाही हात सोडलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर काही राजकीय घडामोडींमुळे पुन्हा बालमित्र आणि उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्यासोबत जाण्याचे निश्चित झाले आहे.

सुदेश मयेकर यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर पक्षाला वेगळी ऊर्जा मिळाली होती; परंतु पक्षांतर्गत काही वादामुळे आणि जिल्हाध्यक्ष म्हणून केलेल्या शिफारशींचा वरिष्ठांनी विचार न केल्याने त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त सुदेश मयेकर यांना एकत्र येण्याबाबत सामंत यांची आई स्वरूपा सामंत यांनी सुदेश मयेकरांना साद घातली होती.

त्याला मयेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे; परंतु शिवसेनेत घेताना त्यांचे पुनर्वसन व्हावे, यासाठी आगामी पालिकेच्या निवडणुकीमध्ये ते नगराध्यक्षपदाचे उमेदवार असण्याची शक्यता नाकारता येत नाही; सुदेश मयेकर आपल्या समर्थकांसह उदय सामंत आणि किरण सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

जबाबदारी कोणती देणार

सुदेश मयेकर यांची रत्नागिरी नगरपालिकेत नगरसेवक म्हणून चांगली कामगिरी राहिलेली आहे. त्यांनी जर शिवसेना (शिंदे गटात) प्रवेश केला तर त्यांच्याकडे कोणती जबाबदारी सोपवली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baby Trafficking Case: चार वेळा विकलेले एक महिन्याचे बाळ तेलंगणमधून परत ताब्यात; संभाजीनगर पोलिसांनी बाळ विक्री रॅकेटचा पर्दाफाश

Uttarakhand: उत्तरकाशीत पावसाचे थैमान; ८० ट्रेकर्सची सुटका, उर्वरितांच्या बचावासाठी बचावासाठी ८ हेलिकॉप्टर्स मैदानात video viral

Marathi News Live Updates: दुष्काळाने ऊसही कडू केला; दिवाळी तोंडावर असताना महिला शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, जनावरांच्या चाऱ्यासाठी उभा ऊस विकण्याची वेळ

Oppo K14 Plus 5G स्मार्टफोन लाँच; 144Hz AMOLED डिस्प्ले आणि 45W फास्ट चार्जिंगचा धुमाकूळ! पहा किंमत...

Childhood Cancer Symptoms : मुलाला येणारा ताप केवळ सामान्य ताप नसू शकतो; पालकांनी 'या' धोक्याच्या घंटा कधी ओळखाव्या? तज्ज्ञांनी दिला गंभीर आजाराचा इशारा

SCROLL FOR NEXT