ratnagiri rain update mandangad farmers put crop in farm agriculture monsoon rainfall
ratnagiri rain update mandangad farmers put crop in farm agriculture monsoon rainfall  sakal
कोकण

Ratnagiri Rain Update : जोरदार पावसामुळे भातलावणीला आला वेग; शेतशिवार गजबजले

सकाळ वृत्तसेवा

मंडणगड : डोक्यावर संततधार, तुडुंब भरलेली शेतं, त्यात सर्जा राजाचा नांगर चालवत तालुक्यातील शेतकरी चिखळणीच्या कामांमध्ये मग्न झाला आहे. शेतशिवारे गजबजलेली असून, चिखळणीत भात लावताना लावणीची पारंपरिक गाणी म्हटली जात आहेत. गतवर्षीच्या तुलनेत १३४ मिमी पाऊस कमी असल्याची नोंद झाली आहे.

तालुक्यात सरासरी ३५०० मिमी पाऊस पडतो. मे महिन्यात रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर पेरणी करण्यात आली. चिंतेत असणारा शेतकरी पावसाच्या आगमनाने सुखावला. संततधारेच्या पावसात रोपांची वाढ झाल्याने तो लावणीच्या कामांकडे वळला आहे.

मृग नक्षत्रानंतर पावसाने चांगलाच मुक्काम ठोकला. खलाटी शेतातून पाणीच पाणी झाले. त्यातील जलस्रोत प्रवाहित झाले. मागील चार दिवसांत पावसाने तालुक्याला चांगले झोडपून काढले. मंडणगड, देव्हारे, वेसवी व म्हाप्रळ या मोजणी केंद्रात तीन दिवस शतकी सरासरीची पावसाने नोंद केली.

रोपांची वाढ झाल्याने शेतकरी दिवसभर शेतात राबत असून, लावणीची कामे आटोपण्याकडे लक्ष ठेवून आहे. दिवस उजाडल्यानंतर शेतकरी शेतात धाव घेत असल्याने शेतशिवार गजबजली आहेत. तालुक्यात १० जुलैपर्यंत एकूण ११५४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याच दिवशी १२८८ मिमी पाऊस झाला होता.

नदी, नाले, ओढे यांचा प्रवाह गतिशील झाला आहे. निवळी, भारजा नद्यांचे पात्र भरून वेगाने समुद्राकडे वाहत आहे. पाणथळ शेतात छोटे झरे जिवंत झाले आहेत. तीन दिवस शतकी सरासरीने मुसळधार बरसनाऱ्या पावसाने कालपासून थोडी विश्रांती घेतल्याचे चित्र आहे.

काही ठिकाणी पाण्याचा अभाव

शेतात वाहून येणारे पाणी मोठ्या प्रमाणात असल्याने पाणथळ शेतात त्याचा चिखळणी करताना अडथळा होत आहे. जमीन नांगरताना काही ठिकाणी जमीन कडक राहते. त्यामुळे भाताची रोपे लावताना हाताला इजा होते, तर दुसऱ्या बाजूला काही भागांत उकारी आणि पावसाच्या सरींवर अवलंबून असणाऱ्या भातशेतीत पाणी नसल्याने पावसावर भिस्त राहणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT