कोकण

रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच धुम ठोकलेल्या 'त्या' तिघांचा अखेर लागला शोध

सकाळ वृत्तसेवा

राजापूर (रत्नागिरी) : ऍन्टीजेन तपासणी अहवाल पॉझिटिव्ह येताच लहान मुलासह राजापूरच्या ग्रामीण रुग्णालयातून पलायन केलेल्या तालुक्‍यातील त्या दोन महिलांनी कोल्हापूर गाठल्याचे पुढे आले आहे. मात्र, त्या महिलांचा शोध घेण्यामध्ये आरोग्य विभागाची चांगलीच दमछाक झाली होती.

राजापूर तालुक्‍यातील शेंबवणे येथील एका डॉक्‍टरकडे घरकाम करणाऱ्या दोन महिलांसह घरातील एका मुलाला ताप व अन्य लक्षणे दिसू लागल्याने तेथील सरपंच वैष्णवी कुळये व त्यांचे पती संतोष कुळये यांनी त्यांची कोरोना प्रादुर्भावाची तपासणी होण्यासाठी दोन दिवस आटापिटा केला. मात्र, गावातून राजापूर ग्रामीण रुग्णालयात येण्यासाठी वाहन उपलब्ध होत नव्हते. त्यानंतर आमदार राजन साळवी यांचे स्वीय सहायक सुभाष मालप यांच्या प्रयत्नांतून रुग्णवाहिकेची उपलब्धता झाल्यानंतर तिघांनाही राजापूर ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी दाखल केले.

ऍन्टीजेन तपासणीत या तिघांचेही अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ग्रामीण रुग्णालयाने त्यांच्या उपचारार्थ रायपाटण कोविड केअर सेंटरमध्ये नेण्यासाठी रुग्णवाहिकेची सोय केली. यातील ज्येष्ठ महिलेने कोविड केअर सेंटरमध्ये जाण्यास नकार दिला. थोड्या वेळाने या दोन महिला त्या लहान मुलासह ग्रामीण रुग्णालयातूनच पळून गेल्या. त्या सायंकाळपर्यंत शेंबवणे येथील घरी न पोहोचल्याचे आरोग्य विभागाकडून त्यांची शोधाशोध सुरू होती. रुग्णालयातून पलायन केलेल्या त्या महिला कोल्हापूर येथे असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. दरम्यान, त्यांच्यावर कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे येथील आरोग्य विभागाकडून स्पष्ट केले आहे.

Edited By- Archana Banage

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update: वडेट्टीवारांचे आरोप खरे, उज्वल निकम यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; एस. एम. मुश्रीफ यांची मागणी

Viral Video: माकडांची पूल पार्टी! मुंबईच्या उष्णतेपासून बचावापासून माकडांची स्विमिंग पूलमध्ये मस्ती

ICC Player of The Month : यादीत भारताचा एकही खेळाडू नाही, युएई अन् पाकिस्तानचे क्रिकेटर आघाडीवर

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

SCROLL FOR NEXT