कोकण

रत्नागिरी : राजधानी एक्सप्रेसचे इंजिन रुळावरून घसरले

राजेश कळंबटे

कोकण रेल्वे मार्गांवर उक्षी टनेल मध्ये मडगांवाकडं जाणारी राजधानी एक्स्प्रेसचे इंजिन रुळावरून घसरले.

रत्नागिरी - कोकण रेल्वे मार्गांवर उक्षी टनेल मध्ये मडगांवाकडं जाणारी राजधानी एक्स्प्रेसचे इंजिन रुळावरून घसरले. यामुळे सर्व वाहतूक ठप्प झाली होती. पहाटे साडेचार वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला. रत्नागिरी स्थानकापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या उक्षी टनेल येथे पहाटे राजधानीचे इंजिन घसरले. ही दुर्घटना घडल्यानंतर कोकण रेल्वे मार्गावरील अपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली.

पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडल्यामुळे प्रवाशांना दणका बसला. सुदैवाने प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नसल्याचं कोकण रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. गाडीचे काही डबे टनेल मध्येच होते. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेच्यादृष्टीने रेल्वे प्रशासनाने हालचाली केल्या.

दरम्यान, या प्रकारामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. रत्नागिरी स्थानकात कोचीवली एक्सप्रेस, भोके येथे सीएसटीएम कडे जाणारी, चिपळूणला नागकोईल एक्सप्रेस, दिवा सावंतवाडी एक्स्प्रेस खेडला तर मंगला एक्सप्रेस वैभवावाडीला थांबवून ठेवण्यात आली होती. या मार्गांवर अजून काही तास वाहतूक ठप्प राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठरलं! तीन आठवडे चालणार यंदाचं पावसाळी अधिवेशन, २२ जूनपासून होणार सुरुवात, कोणते मुद्दे राहणार चर्चेत?

Video : युझवेंद्र चहलचे २९ चेंडूंत शतक! पीटरसनने दिलेलं चॅलेंज २१ चेंडू राखून पूर्ण केलं, पण त्यात Twist आहे... ; मोडला एबीचा विक्रम

पाकिस्तानी हवाई दलाचं विमान कोसळलं, २ पायलटचा मृत्यू; घटना CCTVत कैद

Latest Marathi News Live Update : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 जूनला होणार

Sanchita Ugale: छावा चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्रीने संपवलं जीवन, नालासोपाऱ्यातील राहत्या घरात आढळला मृतदेह; DDLJ मध्येही काम केलं होतं

SCROLL FOR NEXT