ratnagiri sakal
कोकण

Ratnagiri : पोलिस अधीक्षकांकडून बंदोबस्ताचा आढावा

जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पोलिस बंदोबस्त तसेच कोरोना खबरदारीबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी या बंदोबस्ताचा गुरुवारी आढावा घेतला. त्यांनी रत्नागिरी रेल्वे स्थानकावर जाऊन तेथील कामाची पाहणी केली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने चाकरमानी गावामध्ये दाखल होत आहेत. कोरोनाचे संकट कायम असल्याने केवळ कायदा आणि सुव्यवस्थाच नाही तर कोरोनाची खबरदारी घेणेही आवश्यक झाले आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनबरोबरच आरोग्य विभाग आणि पोलिस विभागही सज्ज झाले आहे.

पोलिस विभागाकडून महामार्गावर आणि रेल्वे स्थानकावर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या बंदोबस्ताची डॉ. गर्ग यांनी पाहणी केली. पाहणीत रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही सुरू आहेत का, याची माहिती घेतली. कोरोना चाचणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांशीही त्यांनी संवाद साधला तसेच पार्किंग व्यवस्था, एसटी बसेस, येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांच्या मार्गाचीही पाहणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharmendra Pradhan resignation : विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश, धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा

Delhi Student Protest : दिल्लीतील आंदोलनाला पुन्हा हिंसक वळण...पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या

Live Updates Marathi : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, CM फडणवीस दिल्लीकडे रवाना

तरुण कीर्तनकार मुलगी अन् रिंगणात बसलेले वारकरी; 'पाच फुटाचा बच्चन' मधून दुमदुमणार राम कृष्ण हरीचा गजर; कोण आहे ही कलाकार?

देशभरात रविवारी कँडल मार्च, CJPची घोषणा; विद्यार्थी-पालकांसह समर्थकांना सहभागी होण्याचं आवाहन

SCROLL FOR NEXT