ratnagiri shiv sena criticize on nilesh rane 
कोकण

'नीलेश राणेंची वायफळ बडबड शिवसैनिकच थांबवणार'

राजेश शेळके

रत्नागिरी - नारायण राणेंचे दिवटे वायफळ बडबड करीत आहेत. यांची बडबड शिवसैनिकच थांबवणार. नीलेश राणेने समोर यावे, त्याला कसे जाग्यावर आणतो ते बघा. आता आमची लवकर भेट व्हावी, हीच इच्छा आहे, असे थेट आव्हान शिवसेनेचे संपर्क प्रमुख सुधीर मोरे आणि समन्वयक प्रदीप बोरकर यांनी नीलेश राणे यांच्या वक्तव्यावर दिले.  

शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दोन दिवसांपूर्वीच रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार आणि सचिव विनायक राऊत यांच्याविरोधात भाजपचे प्रदेश सचिव नीलेश राणे यांनी विनायक राऊत जिथे दिसतील तिथे डबल फटके देऊ असे म्हटले होते. राणे यांच्या या वक्तव्यानंतर शिवसैनिकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाल्याचे बोरकर यांनी सांगितले. 

नीलेश राणेंवर पलटवार करीत शिवसेनेने प्रथमच अंगावर घेतले आहे.  
रत्नागिरी, सिंधुदुर्गचे समन्वयक प्रदीप बोरकर म्हणाले, नीलेश राणे दोन वेळा खासदारकीच्या निवडणुकीत पडले. ग्रामपंचायत निवडणुकीतही शिवसेनेने मोठे यश मिळवले. याचे शल्य त्यांना बोचत आहे. त्यामुळे नारायण राणेच्या चिरंजिवांची वायफळ बडबड सुरू आहे. शिवसैनिकच ती थांबवणार आहे. त्यांनी कधीही समोरासमोर येऊन विकास कामावर चर्चा करावी. स्वतःचे महत्त्व वाढविण्यासाठी त्यांची ही बडबड सुरू आहे. प्रसार माध्यमांनी त्याकडे दुर्लक्ष करावे. 


जिल्हा संपर्क प्रमुख सुधीर मोरे म्हणाले, मला खंत वाटते की राणेंच्या आरोपाला तेव्हाच सडेतोड उत्तर देण्याची गरज होती, पण असो नीलेश राणे यांनी समोर यावे त्यांना जाग्यावर आणतो. कोण फटकावते ते त्यांना दाखवतो. आता लवकरच भेट व्हावी, ही इच्छा आहे.  यावेळी जिल्हा प्रमुख विलास चाळके, विधानसभाक्षेत्राध्यक्ष राजेंद्र महाडीक, जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, जिल्हा प्रमुख सचिन कदम, वेदा फडके, स्नेहा माने, आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

जिल्हा प्रमुखांचाही इशारा

विनायक राऊत यांच्याबद्दल अतिशय असंस्कृत उल्लेख केल्याबद्दल नीलेश राणे यांचा निषेध करतो. खासदारकीच्या निवडणुकीत दोन वेळा त्यांना धूळ चारली, आमच्या खासदारांचे संसदेत काम चांगले आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात बोलल्यास आम्ही खपवून घेणार नाही. त्यांना त्याच भाषेत उत्तर देऊ. यापुढे त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेऊ, असा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख विलास चाळके यांनी दिला. 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: मी माफी मागतो...! इंग्लंडच्या स्टार फलंदाजाची आयत्यावेळी माघार, हॅरी ब्रूकनंतर त्याच्यावरही होणार बंदीची कारवाई

Pune News : ‘पीटीपी’ अ‍ॅपमुळे वाहतूक शिस्तीत सुधारणा; अडीच लाख तक्रारींवर ९.३२ कोटींचा दंड

‘कुकडू कू’चा गोंधळ रंगला! ‘सुपर डुपर’चं धमाल गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Chakan News : तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाला मंत्रिमंडळाची मंजुरी; ४२०७ कोटींचा प्रकल्प मार्गी

IPL 2026 Marathi News: चेन्नई सुपर किंग्सच्या गळाला मोठा मासा; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने पाकिस्तान सुपर लीगला मारली 'लाथ'

SCROLL FOR NEXT