एसटी बस sakal
कोकण

रत्नागिरी : एसटीसमोर ऐन दिवाळीमध्ये संकट

कामगार आक्रमक; टप्प्याटप्प्याने आंदोलन करणार, १७ संघटनांची मुंबईत बैठक

राजेश शेळके

रत्नागिरी : आर्थिक संकटात सापडलेल्या एसटी महामंडळासमोर ऐन दिवाळीत आणखी एक संकट उभे आहे. तोट्यामुळे मोठ्या आर्थिक विवंचनेत असलेल्या कर्मचाऱ्यांनी संघटनांच्या माध्यमातून न्याय हक्कासाठी काही कठोर निर्णय घेतले आहेत. त्यासाठी राज्यातील १७ संघटनांची मुंबईत बैठक झाली. यात टप्प्या-टप्प्याने आंदोलन करण्याचा निर्णय झाला. एसटी महामंडळ शासनात विलीन करणे, कर्मचाऱ्यांची आर्थिक देयके देणे यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी आंदोलनचे हत्यार कामगार संघटनांनी उपसले आहे. येत्या २७ तारखेला राज्यात आगार पातळीवर उपोषण केले जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढुन त्यानंतर बेमुदत संपाचा इशारावजा नोटीस दिली जाईल.

वेळेवर वेतन होत नसल्याने आर्थिक घडी विस्कटलेल्या एका एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याचा गंभीर प्रकार घडला. तेव्हा शासनाने काही हजार कोटी देऊन एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लावला. मात्र आता वेतनामध्येही अनियमितत आहे. १ किंवा ७ तारखेला होणारे वेतन आता १८ ते २० तारखेपर्यंत जाऊ लागले आहे. तोटा वाढत असल्याने कर्मचारी, अधिकारी हवालदील झालेत.

महामंडळाला सावरण्यासाठी सर्व एसटी संघटना आता एकत्र आल्या आहेत. या कृती संघटनाची बैठक झाली. बैठकीत टप्प्या-टप्प्याने आंदोलन करण्याचा निर्णय झाला. आर्थिक येणे व इतर मागण्यां मागील संपात मंजूरी दिली होती. त्यावर अजून कारवाई झालेली नाही. त्यामुळे २७ ऑक्टोबरला उपोषणाची नोटीस दिली आहे. महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, महाराष्ट्र कामगार सेना, इंटक, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना, क्रास्टाईब संघटनानी पत्र दिले आहे. दिवाळीमध्ये एसटी कर्मचाऱी उपोषण करणार असल्याने याचा वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे. मात्र याबाबत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बोलण्यास नकार दिली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या उपोषण आणि संपाबाबत आम्ही खबरदारी घेतली. संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी आमची चर्चा सुरू आहे. त्यांना विनंती केली, की दिवाळीत एसटीला चांगले उत्पन्न मिळते. त्याचा फायदा घेता येईल. त्यांचे मतपरिवर्तन करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.’’

- अनंत जाधव, एसटी वाहतूक अधीक्षक, रत्नागिरी

एसटी महामंडळ शासनात विलीन व्हावे, आर्थिक देयके आदी मागण्यांसाठी आम्ही सर्व संघटना एकत्र आलो. पहिल्या टप्प्यात २७ ऑक्टोबरला राज्यात आगार, विभागपातळीवर उपोषण केले जाईल. नंतर हिवाळी अधिवेशनावर मोर्चा नेला जाणार आहे. त्यानंतर पुढील धोरण ठरवून शासनाला संपाची नोटीस दिली जाईल.

- संदेश सावंत, सचिव, एसटी कामगार संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT