Arrest sakal media
कोकण

निवळीतील लाच मागणाऱ्या तलाठ्यावर कारवाई

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी: मृत्यू झालेल्या आईचे नाव सातबारा उताऱ्यावरून कमी करून सातबारा उतारा देण्यासाठी 1500 रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या तलाठ्याला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंध विभागाद्वारे सोमवारी सायंकाळी 5.22 वा. सुमारास निवळी येथील तलाठी कार्यालयात करण्यात आली.(ratnagiri-talathi-arrested-in-bribe-case-crime-news-marathi-kokan-news)

राजेश इंदल गुसिंगे (37, रा. खेडशी, रत्नागिरी ) असे अटक करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे. त्याच्या विरोधात तक्रारदाराने दिलेल्या तक्रारी नुसार, तक्रारदार आणि त्यांच्या मृत आईच्या नावे संयुक्तिक नावाने भोके गावात जमीन आहे.तक्रारदाराने निवळी येथील तलाठी कार्यालयात मृत्यू झालेल्या आईचे नाव सातबारा उताऱ्यावरून कमी करून सातबारा उतारा देण्यासाठी अर्ज केला होता.तेव्हा तलाठी राजेश गुसिंगे याने त्यांच्याकडे 2 हजार रुपये लाचेची मागणी केली होती.तडजोडिनंतर 1500 रुपये देण्याचे ठरले होते.

दरम्यान, तक्रारदराने 2 जुलै रोजी लाच लुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार पडताळणी करून लाचेची 1500 रुपये स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंध विभागाने सापळा रचून राजेश गुसिंगेला रंगेहाथ पकडले.ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रवीण कदम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप ओगले, पोलीस हवालदार विशाल नलावडे, पोलीस नाईक दीपक आंबेकर,पोलीस शिपाई गावकर यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fed Rate Hike: अमेरिकेने व्याजदर वाढवले; तुमच्या कर्जाच्या EMI पासून शेअर बाजार ते सोन्याच्या भावापर्यंत काय बदलणार?

Amazon ने भारतात लाँच केले AI-powered 'Alexa+!' हिंदी आणि हिंग्लिश सपोर्टसह सर्व युजर्ससाठी मोफत उपलब्ध...

Latest Marathi News Update : पुण्यात एफडीएची मोठी कारवाई!५६ लाखांचा अन्नसाठी जप्त

FDA: अकरा रुपयांचे सलाईन ३२५ रुपयांना, दर नियंत्रणासाठी ‘एफडीए’चे ‘एनपीपीए’ला पत्र

Provident Fund Latest Update : EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी! PFची पगार मर्यादा २५ हजार; विमा १०.५० लाखांपर्यंत वाढण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT