कोकण रेल्वे मार्गावर मॅंगो ट्रेनसाठी चाचपणी  sakal
कोकण

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर मॅंगो ट्रेनसाठी चाचपणी

२९ नोव्हेंबरला बागायतदारांशी चर्चा; आंबा टिकण्यासाठी रेल्वेतच व्यवस्था

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : कोकणचा हापूस देशाच्या कानाकोपऱ्‍यात पोचवण्यासाठी कोकण रेल्वेने पुढाकार घेतला आहे. कोकण रेल्वे मार्गावर मॅँगो ट्रेन सोडण्यासाठी चाचपणी सुरू झाली असून, २९ नोव्हेंबरला आंबा बागायतदारांशी चर्चा केली जाणार आहे.

सिंधुदुर्ग, रत्नागिरीमधील हापूस आंब्याला मोठी बाजारपेठ मिळण्यासाठी कोकण रेल्वे कार्पोरेशनने स्पेशल मँगो ट्रेन सोडण्याची तयारी सुरू केली आहे. या माध्यमातून कोकणातील बागायतदारांना मुंबई, गुजरातसह देशाच्या कानाकोपऱ्‍यातील वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये हापूस पाठवणे शक्य होणार आहे. हा प्रवास सवलतीचा ठरू शकतो. कुडाळ, वेंगुर्लापासून रत्नागिरीतील बागायतदारांची बैठक घेण्यात येणार आहे.

संबंधित व्यावसायिक आणि बागायदारांशी चर्चा केली जाणार आहे. कोकणातील जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात आंब्याचे उत्पादन होते; परंतु आंबा नाशवंत असल्यामुळे तो वेळेत ग्राहकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. मात्र, वाहतुकीची योग्य सोय आणि स्वस्त सेवा नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात आंबा खराब होतो. त्याची झळ बागायतदारांना सोसावी लागते. हे लक्षात आल्यामुळे कोकण रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. या उपक्रमांतर्गत मँगो स्पेशल ट्रेन सोडून येथील आंबा मुंबई व गुजरातसारख्या मोठ्या बाजारपेठेत पाठविण्यात येणार आहे. हा आंबा प्रवासात टिकावा यासाठी आवश्यक असलेली सोय या ट्रेनमध्ये करण्यात येणार आहे. यासाठी नेमके किती बागायतदार पुढे येतात, त्यांच्या काय समस्या अथवा मागण्या आहेत, याबाबत मते जाणून घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये दुष्काळाचं सावट; दर मिळत नसल्याने शेतकऱ्याने दोन एकर केळीची बाग केली उद्ध्वस्त

Babar Azam : बाबर आझम पुन्हा स्वस्तात बाद, बाऊंड्रीवरच चाहत्यांनी त्याला घेरले, सपोर्ट स्टाफ पळत आला अन्... Video Viral

SCROLL FOR NEXT