कासवाला जीवदान sakal
कोकण

रत्नागिरी : नौकेच्या जाळ्यात सापडलेल्या समुद्री कासवाला जीवदान

शासनाकडून सागरी जीवांना मदत करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : तालुक्यातील काळबादेवी येथील मच्छीमारी नौकेच्या जाळ्यात सापडलेल्या समुद्री कासवाला नौकेवरील तरुणांनी जीवदान देत पुन्हा समुद्रात सोडले. हा प्रकार मंगळवारी (ता. 2) घडला. शासनाकडून सागरी जीवांना मदत करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. त्याचे तंतोतंत पालन मच्छीमारांकडून सुरु आहे.

काळबादेवी येथील संदेश मयेकर यांची मासेमारी नौका आहे. संदेश मयेकर त्यांचे सहकारी रुपेश आणि गणेश यांच्यासोबत मासेमारीकरिता समुद्रात गेले होते. मासेमारीसाठी डोल पाण्यात सोडल्यानंतर त्या डोलीत मासळीसह एक मोठे समुद्री कासव सापडले. मासळी जाळ्यात सापडल्यानंतर ते बाहेर काढत असताना कासव आढळले. जाळं पाण्यातून बाहेर काढत बोटीवर घेण्यात आले. बोटीवरील तरुणांनी त्या कासवाची जाळ्यातून सुटका केली. हे करताना जाळ्याच्या नुकसानीचीही त्यांनी परवा केली नाही. ते कासव व्यवस्थितरित्या जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी मच्छीमारांनी प्रयत्न केले.

त्या कासवाला पुन्हा समुद्रात सोडून देण्यात आले. थंडीचा मोसम सुरु झाला की कोकण किनारपट्टीवर कासवं अंडी घालण्यासाठी दाखल होतात. ती मच्छीमारांच्या जाळ्यात सापडण्याचे प्रकार घडतात. शासनाकडून अशा समुद्री जीवांना संरक्षण द्या असे आवाहन करण्यात येत आहे. हे करताना मच्छीमारी जाळ्यांचे नुकसान झालेच तर त्याची भरपाई शासनाकडून दिली जाते. काळबादेवी येथील मच्छीमारांनी जीवदान दिलेल्या त्या कासवाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून तरुण मच्छीमारांच्या कामगिरीचे कौतूक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Blood Donation Rules : रक्तदान शिबिरांबाबत आयुक्त तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय!

Manoj Jarange On Farmer Relief : "५ हजारांसाठी शेतकऱ्यांनी बँकेच्या रांगेत मरायचं का?"; मनोज जरांगेंचा सरकारवर थेट हल्लाबोल, म्हणाले...

Latest Marathi News Update: राज्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

Social Media Backlash : "व्ह्यूजसाठी इतक्या खालच्या पातळीला..."; पत्नीला पाळीव कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजले, यूट्यूबर सौरभ जोशीवर नेटकरी भडकले!

Jailer 2 Movie Review : रजनीकांतच्या 'जेलर २'चा प्रेक्षकांवर प्रभाव कसा? वाचा रिव्ह्यू

SCROLL FOR NEXT