भात, आंब्याच्या विविध जाती लक्षवेधी sakal
कोकण

रत्नागिरी जिल्हा : भात, आंब्याच्या विविध जाती लक्षवेधी

प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा

हर्णै: दापोलीतील कोकण कृषी विद्यापीठातील सुर्वणपालवी महोत्सवातील राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात भाताच्या पिकवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या ३१ जाती, त्यामध्ये लाल तांदूळ रत्नागिरी-७, हायब्रीड सह्याद्री, संकरित सह्याद्री या जाती विशेष अशा ठेवल्या होत्या. तसेच आंब्याच्या विद्यापीठाने विकसित केलेल्या विविध प्रकारच्या १५० देश-विदेशातील जातींचे सादरीकरण या ठिकाणी करण्यात आले आहे.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ ‘सुवर्ण पालवी’ कृषी महोत्सव उद्‌घाटन समारंभाच्यावेळी विविध शेती व मस्त्यशेतीविषयक प्रदर्शनाचे आयोजन केले होते. प्रदर्शनाचे उद्‌घाटन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. हे प्रदर्शन पाहण्यासाठी शेतकऱ्यांसह नागरिकांनी गर्दी केली होती.

माती विनाशती (हायड्रोफॉनिक्स) उपक्रमांतर्गत भाजीपाला लागवडीसंदर्भात माहिती दिली जात होती. विद्यापीठाने विकसित केलेल्या भाजीपाल्याच्या विविध जाती तसेच कंदवर्गीय पिकांचे विविध नमुने या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत. जैविक खते उत्पादनांचे दालन या ठिकाणी ठेवण्यात आले होते. जैवतंत्रज्ञानावर आधारित लाल केळी, सफेद वेलची, केळी या केळ्यांच्या जातीही लक्ष वेधून घेत आहेत.

मत्स्यशेतीअंतर्गत शोभिवंत मत्स्यपालन, गोड्या पाण्यातील मत्स्यपालन, खेकडा पुष्टीकरण आदी प्रकारचे मत्स्यशेती संदर्भातले नमुने शेतकऱ्यांचे आकर्षण ठरत आहेत. कीटकशास्त्र विभागांतर्गत विविध कीड नियंत्रणाची उपाययोजना, विविध पिकांवरील किडींची व त्यांच्या नियंत्रणाची माहिती प्रदर्शनामध्ये दिली जात आहे. शेतीसाठी लागणारी सर्व अवजारे व सर्व यंत्रसामुग्रीबाबत माहिती व नमुने या ठिकाणी उपलब्ध आहेत. मृद व रसायनशास्त्रांतर्गत अन्नपूर्णा ब्रिकेट व आम्रशक्तीचे नमुने या ठिकाणी ठेवण्यात आले होते.

तसेच या प्रदर्शनामध्ये पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागांतर्गत शेळीच्या जातीमध्ये कोकणकन्या व गायीच्या जातीमध्ये कोकणकन्या या जाती आकर्षित ठरल्या होत्या. सौरकुकर सोलर टनेल, ड्रायर यासारखे सौरऊर्जेवर चालणारे अपारंपरिक ऊर्जास्त्रोत या प्रदर्शनामध्ये मांडण्यात आले होते. उद्यानविद्या विभागाने विविध प्रकारच्या जातीच्या फळांपासून विविध प्रकारचे प्रक्रियायुक्त पदार्थ बनवण्याचे प्रदर्शन आयोजित केले होते. तसेच बांबू संग्रहालय आणि बांबू वर्कशॉपमध्ये तर विविध वस्तूंचे प्रदर्शन आदी तऱ्हेचे प्रदर्शनाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये दापोली कृषी विद्यापीठाबरोबरच पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, महात्मा ज्योतिबा फुले विद्यापीठ राहुरी यांनी सहभाग घेतला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rekha Gupta Organ Donation : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी रेखा गुप्तांचा मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प; नागरिकांनाही आवाहन

आमचे मार्ग आता जुळत नाहीत! Prithvi Shaw अन् आकृती अगरवाल यांचा वेगळा होण्याचा निर्णय; क्रिकेटपटूच्या पोस्टची चर्चा...

लग्नानंतर स्वयंपाक शिकली मेघना एरंडे; म्हणाली- माहेरची आणि सासरची लोकं गणेशोत्सवात आमच्या घरी येतात आणि...

Tata Sons Reappointment : RBI च्या निर्देशानंतर टाटा समूहात मोठा उलटफेर! नोएल टाटांचा विरोध डावलून एन. चंद्रशेखरन यांची अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती

NTA Exam Calendar 2026-27 Out : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! जेईई मेन, यूजीसी-नेटसह प्रमुख परीक्षांच्या तारखा जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT