रत्नागिरी : अत्याधुनिक जलशुद्धीकरणामुळे मिळणार शुद्ध पाणी sakal
कोकण

रत्नागिरी : अत्याधुनिक जलशुद्धीकरणामुळे मिळणार शुद्ध पाणी

३० वर्षांनी दुरुस्ती ; दोन कोटीचा खर्च, दिवसाला १५ एमएलडी पाणी शुद्धीकरण क्षमता

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राने नवे रुप घेतले आहे. ३० वर्षानंतर प्रथमच या केंद्राची सर्व बाजूंनी दुरुस्ती करण्यात आली आहे. सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून स्वच्छ पाणी शहरवासीयांना वितरित होत आहे. मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या नुतनीकरण झालेल्या केंद्राचे उदघाटन झाले. अत्याधुनिक फिल्टरहाऊस बनल्याने १०० टक्के शुद्ध पाणी शहरवासीयांना मिळण्यास सुरवात झाली आहे.

पालिकेने दोन कोटी रुपये खर्च करून एरिएशन फाउंटन दुरुस्ती, वॉटर चॅनल, फ्लॅश मिक्सर, फिल्टर बेल्ट, बॅकवॉश युनिट, व्हॉल्व्ह, क्लोरिन युनिट अशी यांत्रिक व विद्युत दुरुस्ती करून पालिकेचे अत्याधुनिक फिल्टर हाऊस बनवला आहे. शहरातील साळवी स्टॉप येथे पालिकेचे जलशुद्धीकरण केंद्र आहे. दिवसाला सुमारे १५ एमएलडी पाणी शुद्ध करण्याची क्षमता केंद्राची आहे; मात्र गेल्या ३० वर्षांमध्ये त्याची दुरुस्ती झालीच नाही. जलशुद्धीकरणाचा दर्जा घसरला होता. ते शहरवासीयांच्या आरोग्यावर बेतण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर नगराध्यक्ष बंड्या साळवी यांच्यासह सर्व नगरसेवक, तत्कालीन मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे आणि पाणी अभियंता अविनाश भोईर यांनी एकत्रित बैठक घेतली. स्वच्छ आणि मुबलक पाणी देण्याच्या दृष्टीने निर्णय घेतला. फिल्टर हाउसच्या दुरुस्तीसाठी २१ कोटीचा निधी दिला. संपूर्ण जलशुद्धीकरण केंद्राची दुरुस्ती घेतली.

मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या जलशुद्धीकरण केंद्राचे उदघाटन झाले. या वेळी नगराध्य़क्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी, जिल्हाप्रमुख विलास चाळके, प्रमोद शेरे, संजय साळवी, बिपिन बंदरकर, निमेश नायर आदी उपस्थित होते. त्यामुळे शहवासीयांना १०० टक्के शुद्ध पाणी मिळणार आहे. पावसाळ्यातील गढूळ पाणीदेखील फिल्टर झाल्यानंतर १०० टक्के शुद्ध मिळेल. सध्या दिवसाला ११ एमएलडी पाणी शुद्ध करून ते पुरविले जाते; मात्र नवीन ३ विद्युत पंप बसविल्याने त्याची क्षमता वाढली असून १८ एमएलडी पाणी उचलले जात आहे.

...असे होते पाण्याचे शुद्धीकरण

शीळ जॅकवेलमधून पाणी एरिएशन फाउंटनमध्ये येते. तेथून येणारे पाणी वॉटर फ्लॅश मिक्सरमध्ये सोडल्यावर पाण्यातील कार्बन डायऑक्साईड व इतर गॅस निघून जातील. त्यामध्ये ऑक्सिजन मिक्स होईल, याची काळजी घेतली जाते. वॉटर फ्लॅश मिक्सरमध्ये काही डोस पाण्यात मिक्स केले जातात. ते पाणी मोठ्या टँकमध्ये शांत केले जाते. त्यातील गढूळता असेल तर ती पॉझिटिव्ह-निगेटिव्ह फेसच्या स्वरूपात वर येते. ते बाजूला करून स्वच्छ पाणी वॉटर चॅनलद्वारे फिल्टर बेल्टमध्ये येते. या बेल्टच्या चार लेअर असतात. त्यात फिल्टर होऊन स्टोअरेज टॅकला १०० टक्के फिल्टर पाणी येते. तेथे क्लोरिन गॅस सोडला जातो. त्यामुळे पाणी पिण्यासाठी १०० टक्के सुरक्षित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

England vs Argentina: ७ मिनिटांत मॅच फिरवली! अर्जेंटिनाची फायनलमध्ये धडक; इंग्लंडचे ६० वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न भंगले

भारतावर शंभर टक्के आयात शुल्क लावण्याचं अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक; रशियाच्या तेल खरेदीवरुन पाच देशांवर संकट?

Kannad Water Supply Scheme : कन्नड शहरासाठी ५६ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर! ​आमदार संजना जाधव यांच्या पाठपुराव्याला यश

Tukaram Mundhe: सिया गोयलच्या कुटुंबियांना तुकाराम मुंढेंच्या पथकाचा दणका; पुण्यातलं दुकान केलं सील, आठ लाखांचा माल जप्त

Mangalwedha News : स्व. नागनाथ आण्णाचा पाण्याचा लढा पुढे कायम ठेवू; प्रा. शिवाजीराव काळुंगे

SCROLL FOR NEXT