Ratnagiri ZP CEO Anchal Goal Transfer To Mumbai
Ratnagiri ZP CEO Anchal Goal Transfer To Mumbai  
कोकण

आचल गोयल यांची 'येथे' बदली

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी - जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांची बदली मुंबईतील महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाच्या सह व्यवस्थापकीय संचालक पदावर झाली आहे. विश्‍वासात न घेता कामकाज करत असल्याचा ठपका ठेवत अविश्‍वास ठराव आणण्याचा जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न आचारसंहितेमुळे रखडला होता. 5 नोव्हेंबरला विशेष सभा निश्‍चित झाली असतानाच गोयलांची बदली झाल्याने तिसऱ्या अविश्‍वास नाट्यावरही पडदा पडला आहे. 

जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या, भरतीमधून जिल्ह्यात नियुक्‍त झालेल्या शिक्षकांचे समुपदेशन, आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया, ग्रामसेवकांवरील कारवाईचे आदेश याबाबत निर्णय घेताना विश्‍वासात घेतले जात नाही, असा ठपका जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी ठेवला होता. त्यावरुन प्रशासन विरुद्ध पदाधिकारी अशी स्थिती निर्माण झाली होती. विधानसभा आचारसंहिता लागल्यानंतर अविश्‍वास ठरावाची विशेष सभा ठरली; मात्र आदल्या दिवशी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आचारसंहितेचे कारण देत ती घेऊ नये, असे आदेश काढले. पदाधिकारी, सदस्यांना सभागृहात येऊन माघारी परतावे लागले होते. त्यावेळी अविश्‍वास रखडणार हे निश्‍चित झाले होते. 

विधानसभा निवडणूक आचारसंहिता उठल्यानंतर लगेचच अविश्‍वास ठरावासाठी विशेष सभा 5 नोव्हेंबरला ठेवण्यात आली होती; मात्र सीईओ गोयल यांची बदली सहव्यवस्थापकीय संचालक पदावर झाल्याचे पत्र 31 ऑक्‍टोबरला सायंकाळी जिल्हा परिषदेत धडकले. सध्याचा पदाचा कार्यभार कोकण विभागीय आयुक्‍त यांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्याकडे सोपवून नवीन पदाचा कार्यभार त्वरित स्वीकारावा असे पत्रात नमूद केले आहे. हे पत्र अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या सहीचे आहे. गेले काही दिवस गोयल या सुटीवर होत्या. पदभार अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. बामणे यांच्याकडे आहे. 

प्रशासनातील एका संघटनेने सीईओंचे कामकाज चांगले आहे, असे पत्रही शासनाला दिले होते. त्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या निर्णयाबाबत शंकाकुशंका घेतल्या जात होत्या. अविश्‍वास ठरावापूर्वीच गोयल यांची बदली झाल्याने 5 नोव्हेंबरला होणाऱ्या अविश्‍वास ठरावाच्या सभेकडे सर्वांचे लागले आहे. अविश्‍वास ठरावाची सभा घेऊन त्यामध्ये प्रशासनाच्या बाबी उघड्यावर आणण्यासाठी पदाधिकाऱ्यांकडून दबाव तंत्राचा वापर केला जाण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

सभेबाबत साशंकता 

ज्या उद्देशाने विशेष सभा बोलावण्यात आली आहे, ती पूर्ण झाली आहे. सीईओंची बदली झाल्यामुळे सभा घेऊ नये अशी टिपणी ठेवण्याच्या हालचाली जिल्हा परिषद सामान्य प्रशासनकडून सुरू आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT