ratnasagar beach resort seal in ratnagiri order of collector in ratnagiri 
कोकण

कोकण : रत्नसागर बिच रिसॉर्ट केले सील

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : शहराजवळील भाट्ये समुद्र किनारी असलेल्या ‘रत्नसागर बिच रिसॉर्ट’ला आज जिल्हा प्रशासनाने सील केले. सप्टेंबरमध्ये या रिसॉर्टचा करार संपल्याने ते सील केले आहे. पर्यटन वाढीच्या दृष्टीने ते महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या ताब्यात देता येईल का ? याचा विचार सुरू आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.

भाट्ये समुद्रकिनारी आलिशान रत्नसागर बीच रिसॉर्ट उभारण्यात आले. तत्कालीन पर्यटन मंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी भाट्येची ही शासकीय जागा करारावर घेऊन हे आलिशान रिसॉर्ट बांधले. छोट्या-छोट्या एसी, नॉन एसी रुम बांधल्याने देश-विदेशातील पर्यटकांनी त्याला चांगली पसंती दिली. पर्यटन वाढीला या रिसॉर्टचा चांगला फायदा झाला. मात्र स्थानिक ऑनलाईन बुकिंमुळे स्थानिक काम आणि बाहेरचे पर्यटक येथे अधिक येतात. 

प्रशस्त जागा असल्याने वेगवेगळ्या कंपन्यांचे अनेक कार्यक्रम येथे होतात. या रिसॉर्टमुळे सुरवातीला स्थानिक पातळीवर काहीसा विरोध झाला होता. मात्र तो लगेच मावळला. याबाबत जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा म्हणाले, रिसॉर्ट मालकाचा जिल्हा प्रशासनाच्या या जागेशी झालेला करार संपुष्टात आला आहे. त्यामुळे रत्नसागर बीच रिसॉर्टला आम्ही सील केले आहे. मोठी जागा आणि तयार स्ट्रक्चर आहे. पर्यटनवाढीला त्याचा फायदा व्हावा, या अनुषंगाने ते महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या ताब्यात देण्याचा विचार आहे. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanju Samson 0.32s Video: संजू सॅमसनचा 'हा' Video का झालाय व्हायरल? लोकेश राहुलने हाक मारली, सुरुवातीला तो पुढे निघून गेला अन्...

वृद्ध, दिव्यांग कर्मचाऱ्यांचा त्रास कमी होणार, कार्यालयांत विशेष सुविधा मिळणार; पालिकेचा महत्त्वाचा निर्णय

MLA Randhir Savarkar: शेतकऱ्यांच्या पीक कर्ज फेडीची मुदत ३० जूनपर्यंत वाढवावी: आमदार रणधीर सावरकर, अन्याय दूर करा!

Eknath Shinde: शिवसेना-भाजपमध्ये नाराजी? एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; भाजपची तक्रार करत अमित शहांना मनातील खदखद सांगणार!

Indian Army Agniveer Bharti : भारतीय लष्करात अग्निवीरांसाठी मेगा भरती; ऑनलाईन प्रक्रिया सुरु, घरबसल्या कसा अर्ज करायचा? पाहा

SCROLL FOR NEXT