ratris khel chale serial ishu on konkan marathi news 
कोकण

अण्णा नाईक परत येणार', कोकणात  रंगल्या भिंती अन् 

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी (सिंधुदुर्ग)  : येथील सार्वजनिक ठिकाणच्या भिंतीवर "अण्णा नाईक परत येणार', अशा आशयाचे लिहिलेले संदेश आज येथील युवक राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन पुसले. याबाबत संबंधित यंत्रणांना निवेदन देऊन सुद्धा त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे उपस्थितांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. 

"रात्रीस खेळ चाले' मालिकेच्या प्रमोशनच्या नावाखाली हा प्रकार संपूर्ण जिल्ह्यात घडला आहे. त्यामुळे संबंधित मालिकेच्या प्रमुखांनी संदेश लिहिलेल्या भिंती तत्काळ सुस्थितीत कराव्यात, अन्यथा आम्ही या ठिकाणी चित्रीकरण होऊ देणार नाही, असा इशाराही उपस्थितांनी दिला. यावेळी युवक राष्ट्रवादी तालुकाअध्यक्ष राजू धारपवार, अर्षद बेग, शहरअध्यक्ष अभिजीत पवार, राष्ट्रवादी जिल्हा उद्योग व व्यापार विभाग सदस्य याकूब ऊर्फ पप्पू शेख, युवक सदस्य परेश तांबोस्कर, विवेक पवार, अमित सावंत, इम्रान शेख, प्रतीक सावंत, शेलटन नरोना, दीपक पाटकर, सोहेल शेख आदींसह तालुक्‍यातील युवक कॉंग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. 

राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी सांगितले, की "रात्रीस खेळ चाले' मालिकेच्या प्रमोशनसाठी जे काही गैरकृत्य संबंधीत मालिकेच्या निर्मात्यांनी केले आहे. ते अत्यंत निषेधार्थ आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी. येथील उपजिल्हा रुग्णालय व विठ्ठल मंदिर परिसरात हा प्रकार घडला आहे. तर याबाबत संबंधित यंत्रणांना निवेदन देऊनही त्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत होती. त्यामुळे युवक राष्ट्रवादीने पुढाकार घेऊन संबंधित भींती सुस्थितीत केल्या आहेत.  

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT