Re-violation of the ban order; That officer quarantine kokan marathi news 
कोकण

बंदी आदेशाचा पुन्हा भंग; तो अधिकारी क्वारंटाईन

सकाळ वृत्तसेवा

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी पुन्हा एकदा लॉकडाउनसंबंधी आदेशाचा भंग केला. त्यामुळे प्रशासनाने त्यांना सोमवारी संस्थात्मक क्वारंटाईन केले आहे. 

कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने 22 मार्चच्या मध्यरात्री पूर्ण देश लॉकडाउन करीत जिल्ह्याच्या बाहेर जाण्यास मनाई केली होती. हा नियम मोडीत माध्यमिक शिक्षणाधिकारी कडूस यांनी नगर येथील आपला गाव गाठला होता. याबाबत धनगर समाज नेत्यांनी आवाज उठविला होता. त्यानंतर त्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांनी नोटीस बजावली होती. कोल्हापूर येथील शिक्षण संचालक कार्यालयात प्रस्ताव दाखल केला होता. मात्र, त्यांच्यावर कोणतीही प्रशासकीय कारवाई करण्यात आली नाही. कडूस लॉकडाऊन असल्याने गावी अडकल्याने त्यांचा पदभार प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे देण्यात आला होता. अजून लॉकडाऊन सुरू आहे. जिल्ह्याच्या सीमा बदली करण्यास परवानगी नाही. सक्षम कारण असल्यास अशी परवानगी दिली जाते; मात्र असे कोणतेही सक्षम कारण नसताना माध्यमिक शिक्षणाधिकारी कडूस सोमवारी  जिल्ह्यात दाखल झाले आहेत. जिल्हा प्रशासनाने त्यांना खबरदारी म्हणून संस्थात्मक क्वारंटाइन केले आहे. 

किती दिवस ते निश्‍चित नाही! 
याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांना विचारले असता ते म्हणाले, ""माध्यमिक शिक्षणाधिकारी कडूस यांना संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात आले आहे. मात्र, 14 की 28 दिवसांसाठी ते अद्याप ठरलेले नाही.'' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT