Ready For More Tranins For Mango Transport Vilas Salaskar Comment 
कोकण

खूषखबर ! आंब्यासाठी आणखी रेल्वेगाडीही सोडण्याची `यांची` तयारी

सकाळवृत्तसेवा

देवगड ( सिंधुदुर्ग ) - जिल्ह्यातील बागायतदारांची मुंबईसाठी आंबा वाहतुकीची काही अडचण असेल आणि बागायतदारांची मागणी असल्यास सिंधुदुर्गहून आंबा वाहतुकीसाठी आणखी एक रेल्वेगाडी सोडण्याची खासदार विनायक राऊत यांची तयारी असल्याचे शिवसेना जिल्हा उपप्रमुख विलास साळसकर यांनी पत्रकारांना सांगितले. कोरोनाच्या काळात राऊत फिरतात कसे? असे सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांचे म्हणणे असेल तर भाजप आमदार प्रसाद लाड आणि माजी आमदार प्रमोद जठार कशासाठी आले होते? असा प्रश्‍नही त्यांनी विचारला आहे. 

जिल्ह्यातील आंबा बागायतदारांना मुंबईमध्ये आंबा पाठवण्यासाठी वाहतुकीची समस्या जाणवत असेल आणि बागायतदारांची खासदार राऊत यांच्याकडे त्यादृष्टीने काही मागणी आल्यास आणखी एक जादा रेल्वेगाडी सोडण्याची तयारी असल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले आहे. त्यामुळे बागायतदारांनी संपर्क साधावा असे आवाहन श्री. साळसकर यांनी केले आहे.

तसेच राऊत यांच्या जिल्हा दौऱ्यावर झालेल्या टीकेवर उत्तर देताना ते म्हणाले, ""प्रशासनाची काही अडचण असल्यास त्याची सोडवणूक करण्यासाठी आणि स्थानिक जनतेला काही त्रास होऊ नये यासाठी खासदार राऊत जिल्ह्यात आले. त्यांना कॉरंटाईन करा असे विरोधकांचे म्हणणे असेल तर भाजपचे भाजप आमदार प्रसाद लाड आणि माजी आमदार प्रमोद जठार कशासाठी आले होते?. मग त्यांनाही कॉरंटाईन केले पाहिजे हे त्यांना का सुचले नाही.? खासदार राऊत नियम आणि निकषांचे पालन करून जिल्हा दौरा करीत आहेत.'' 

ते म्हणाले, ""भाजपकडून बीग बाजारमध्ये आंबा पाठवून बागायतदारांचे भले केल्याचे सांगितले जात आहे. परंतू भाजप कार्यकर्त्यांनी किती आणि कोणाचा आंबा पाठवला हे जाहीर करावे?'' 

पडेलमध्ये कमळथाळी हवी 

शिवसेनेने शासनाच्यावतीने जामसंडे येथे शिवभोजन सुरू केल्यामुळे भाजपने देवगडात कमळ थाळी सुरू केली. त्यापेक्षा भाजपने पडेल कॅंटीन परिसरात कमळ थाळी सुरू केल्यास त्याचा गरजूंना लाभ होईल, असे विलास साळसकर यांनी सुचवले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayank Lohar News: मुंबई लोकलमधील हत्याकांडाचा उलगडा! अखेर आरोपीला अटक; वडिलांच्या चौकशीतून मिळाला ठावठिकाणा

ओंकार भोजनेच्या गाजलेल्या स्कीटवर विद्या बालन फिदा; स्वतः बनवला रील, व्हिडिओ पाहून नेटकरी खुश

Latest Marathi News Live Update : यवतमाळ जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात

किरकोळ वाद आता चाकूहल्ल्यांपर्यंत... प्रवाशांमध्ये संताप का वाढतोय? मुंबई लोकलमधील वाढत्या आक्रमकतेचे विश्लेषण

Baramati News : बारामतीच्या पाणीपुरवठा प्रकल्पांना गती देण्याचे सुनेत्रा पवार यांचे निर्देश....

SCROLL FOR NEXT