For This Reason Daughter Gave Fire To Father Sindhudurg Marathi News  
कोकण

...यासाठी मुलीनेच दिला वडिलांना अग्नी 

सकाळवृत्तसेवा

वेंगुर्ले ( सिंधुदुर्ग ) - वृद्धापकाळाने निधन झालेल्या वडिलांना, मुलगा असताना तो लॉगडाऊनमुळे मुंबईत अडकल्याने विवाहीत मुलीला अग्नी द्यावा लागला. ही घटना म्हाडा कॉलनी येथे घडली. 

मूळचे परबवाडा-गवंडेवाडा येथील रहिवासी नारायण नानू गवंडे (वय 80) हे गेली काही वर्षे वेंगुर्ला कॅम्प येथील म्हाडा वसाहतीमध्ये आपल्या मुलीच्या शेजारी राहत होते. वृद्धावस्थेत असलेल्या नारायण गवंडे यांची दोन दिवसांपूर्वी अचानक प्रकृती खालावली आणि 9 मे रोजी पहाटे चारच्या सुमारास त्यांचे निधन झाले.

त्यांचा मुलगा मुंबई-घाटकोपर येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास असल्याने आणि कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरु असल्याने वडिलांच्या अंत्यविधीसाठी येणे त्याला शक्‍य झाले नाही. त्यामुळे त्यांची विवाहीत मुलगी सायली समीर कोचरेकर हिने आपल्या वडिलांच्या पार्थिवाला अग्नी दिला. येथील दाडाचे टेंब स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गवंडे यांच्या पश्‍चात मुलगा, तीन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Supply: मुंबईतील धरणातील जलसाठा ८८ टक्क्यांवर, १० टक्के पाणीकपात कधी संपणार? महत्त्वाची माहिती समोर

Ajinkya Rahane: क्रिकेट संपलं तुझं कौतुक कमी झालं, पण तूच आमचा खरा हिरो! अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीनंतर आई वडिलांचं भावूक पत्र व्हायरल

Pune Bangalore Highway : पहिल्याच पावसात 6 पदरी महामार्गाचे पितळ उघडे! गांधी रुग्णालयाजवळ उड्डाणपुलाची भिंत कोसळली; प्रवास बनला धोकादायक, निकृष्ट कामाबद्दल कारवाई होणार का?

Latest Marathi News Live Update : भिवंडी इमारत दुर्घटना : दोषींवर कठोर कारवाईचे आदेश; मुख्यमंत्री फडणवीसांची घटनास्थळी भेट

Pune News: आळेफाटा येथील जिल्हा परीषदेच्या शाळेजवळ अज्ञात व्यक्ती रात्रीच्या वेळी कचरा टाकणा-यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी

SCROLL FOR NEXT