Record Breaks Rain In Amboli Sindhudurg District News 
कोकण

आंबोलीत पावसाचा रेकॉर्डब्रेक 

अनिल चव्हाण

आंबोली - येथे यंदा 430 इंच इतका रेकॉर्ड ब्रेक पाऊस लागला आहे. गेल्या 25 वर्षातील हा उच्चांक आहे. इथली सरासरी 300 इंच आहे. जगात सर्वाधिक पाऊस चेरापुंजी येथे 400 इंचाच्या सरासरीने पडतो. आंबोलीने त्यालाही मागे टाकले आहे. 

आंबोलीच्या पावसाने यावर्षी विश्‍वविक्रम केला आहे. यावर्षी 430 इंच पावसाची नोंद आंबोलीत झाली आहे. 25 वर्षानंतर एवढा पाऊस प्रथमच आंबोलीत झाला आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाणांपैकी एक म्हणून आंबोलीची ओळख आहे. देशातील चेरापुंजी हे प्रथम क्रमांकाचे ठिकाण. त्याचबरोबर मेघालयातील मौसिंराम येथे जगातील सर्वाधिक पाऊस पडतो. तेथे साधारण 400 इंचाची सरासरी असते. तेथे 8 महिने पाऊस पडतो; मात्र यावर्षी तेथे पाऊस कमी पडला आहे. चेरापुंजी येथे ही साधारण 7 ते 8 महिने पाऊस पडतो.

आंबोलीत मात्र यावर्षी पावसाने विक्रम केला आहे. यावर्षी पाऊस जगात सर्वाधिक कोकणातील आंबोलीत पडला आहे. 10750 मिलिमीटर एवढा पाऊस झाला आहे. 1994 पासून एवढी पावसाची नोंद प्रथमच आंबोलीत झाली आहे. 1980 च्या दशकात 400 इंचापर्यंत पावसाची नोंद व्हायची; मात्र पाऊस जूनपासून सुरू होऊन दसऱ्यापर्यंत पडायचा. यावर्षी जूनमध्ये 40 इंच पाऊस होता. जुलैचे 2 आठवडे पाऊस एकदम कमी होता; मात्र जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाने झोडपून काढले. ऑगस्टमध्ये पावसाने जोर मारून रेकॉर्ड केले. 17 इंच या सरासरीने 10 दिवस पाऊस झाला होता. 

अतिपावसाचा आंबोलीला फटकाही बसला. पावसामुळे घाट कोसळण्याबरोबर गंभीर परिस्थितीही निर्माण झाली होती. जनजीवनावर गंभीर परिणामही झाला होता. पडझडही झाली होती. वर्षा पर्यटनावर, हॉटेल व्यावसायिक, शेतकरी या सर्वांवर परिणाम झाला. आंबोलीत अनेक वर्षानंतर असा पाऊस झाला. पावसाने जागतिक विक्रम केला. 

यंदा सव्वाशे इंच जादा 

आंबोलीत साधारण 300 इंच ही सरासरी होती; मात्र सव्वाशे इंच पाऊस यावर्षी जास्त झाला आहे. यावर्षी जनावरांना हिरवा चारा अधिक काळ मिळणार आहे. दिवाळीही पावसात असल्याने यावर्षी हिरमोड झाला. पर्यटकांनी पाठ फिरवल्यामुळे शेतकरी, कामगारवर्ग, दूध उत्पादक, हॉटेल व्यावसायिक यांच्या अर्थकारणावर परिणाम झाला. यावर्षी आंबोलीत हॉटेल व्यवसायात पावसामुळे मंदीचे सावट दिसून आले. पाऊस, निवडणूक आणि आर्थिक मंदी यामुळे हॉटेल व्यवसाय मंद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Release : कोयना धरणाच्या सांडव्यावरून 18,337 तर वीज गृहातून 1,050 क्युसेक विसर्ग; सहा वक्र दरवाजे चार फुटांवरून तीन फुटांपर्यंत आणले खाली

Maharashtra Farmer Loan Waiver : वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर; 10 कोटी 20 लाखांचा लाभ मंजूर

Amazon Great Freedom Sale 2026: आजपासून मेगा सेल! Galaxy S25 Ultra 40 हजारांनी स्वस्त, पाहा कोणत्या वस्तूंवर मिळतोय मोठा डिस्काउंट

Marathi News Live Updates : भंडारा येथे तीन वर्षीय बालिकेवर अत्याचार, आरोपीला फाशी देण्याच्या मागणीसाठी भव्य आक्रोश मोर्चा

Koyna Dam Tailrace Water Issue : समुद्रात जाणारे कोयनेचे पाणी कोकणाला मिळणार का? पुन्हा नवे सर्वेक्षण सुरू; 'हा' निर्णय ठरवणार भविष्य

SCROLL FOR NEXT