recruitment of teachers are open in ratnagiri under the pavitra portal beneficial for teachers 
कोकण

भावी शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण ; भरतीवरील बंदी उठली

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : पवित्र पोर्टलवरून शिक्षकभरती करण्यावरील बंदी उठवण्यात आल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षक उपलब्ध होणार आहेत. जिल्हा परिषद शाळांसह हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये शिक्षक उपलब्ध होण्याच्या आशा पल्लवित झाल्या असून विद्यार्थ्यांचे नुकसान आता टळेल.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात परजिल्ह्यातील शिक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तीन वर्षे नोकरी करून ते आंतरजिल्हा बदलीने गावाकडे जातात. परिणामी शिक्षकांची वानवा निर्माण होते. यामध्ये विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. या भरतीसाठी पवित्र पोर्टलचा पर्याय वापरण्यात आला; मात्र २०१७ पासूनची ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही; परंतु यात जि. प. शाळा आणि हायस्कूलमधील विद्यार्थ्यांचे मात्र नुकसान होत आहे. ९ ऑगस्ट २०१९ ला एक निवड यादी प्रसिद्ध झाली; मात्र मुलाखतीद्वारे होणाऱ्या भरती प्रक्रियेची यादी अद्याप जाहीर झालेली नाही.

आरक्षणातील रिक्त जागा, विषय शिक्षकांच्या जागा व इतर रिक्त जागांसाठी भरती करण्याची प्रक्रिया सुरू असताना कोविड संकटाने भरती स्थगित झाली. आता कक्ष अधिकारी कविता तोंडे यांच्या ७ डिसेंबरच्या पत्रान्वये पवित्र प्रणालीवरील बंदी उठविल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भावी शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा बिंदुनामावली घोटाळा नाही.

राज्यातील इतर ठिकाणी घोटाळा असल्यामुळे खुल्या प्रवर्गातील जागा अतिरिक्त ठरत आहेत, त्या शिक्षकांचे समायोजन जिल्ह्यात करू नये. नवीन उमेदवारांनाच संधी द्यावी, अशी मागणी जिल्ह्यातील स्थानिकांतून होत आहे. मागासवर्गीय उमेदवारांची ५० टक्के पदे कपात केल्यामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरीतील सातशे ते आठशे पदे अद्याप रिक्त आहेत. या पदांवर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन न करता ती पदे पवित्र पोर्टलमार्फत भरावीत, अशी मागणी होत आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दोन वर्षातून १ चित्रपट तरीही कोट्यवधींचा मालक आहे सलमान खान; कुठून होते अभिनेत्याची कमाई, वाचा साइड बिझनेसचं गणित

Railway Rest House: बेड, फ्रिज, आरओ अन्... भारतीय रेल्वेची मोठी भेट; आधुनिक विश्रामगृह सुरू

Kothrud News : कोथरूडमध्ये एकाच वेळी पाणी व वीजपुरवठा खंडित; नागरिकांचा संताप!

'धुरंधर'च्या यशामध्ये खऱ्या रहमान डकैतच्या मयतीचा व्हिडिओ व्हायरल; एन्काउंटरनंतर अशी होती परिस्थिती, मृतदेहाजवळ...

Latest Marathi News Live Update : सिरियामध्ये स्फोटात पाच जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT