कोकण

पावसाचा जोर वाढणार; रायगड, सिंधुदुर्गमध्ये रेड ऍलर्ट

प्रशांत हिंदळेकर

मालवण (जि. सिंधुदुर्ग) : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबईसह कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे. गुरुवारी मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा आहे; तर रायगड, सिंधुदुर्गमध्ये अतिवृष्टीची शक्‍यता असून रेड ऍलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरीत उद्या (गुरुवारी) मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात परतीच्या पावसाने मंगळवार सायंकाळपासून पुन्हा झोड उठवली. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला अती कमी दाबाचा पट्टा पुढे सरकत असल्यामुळे पुढचे दोन दिवस कोकणात अतिवृष्टीची शक्‍यता वर्तवली गेली आहे. यातच बंगालच्या उपसागरातील पश्‍चिम मध्य भागामध्ये निर्माण झालेला अती कमी दाबाजा पट्टा ताशी 17 किलोमीटर वेगाने पुढे सरकत आहे. याचा परिणाम म्हणून कोकण, गोवा, कर्नाटकातील आतील भाग, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचे सावट वाढले आहे. 

रायगड जिल्ह्यात बुधवारी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरुवारी 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची शक्‍यता आहे. मुंबई वेधशाळेने रेड ऍलर्ट जारी केला आहे. सर्व यंत्रणांना सज्जतेचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही बुधवारी पावसाचा जोर वाढणार असून, ऑरेंज ऍलर्ट जारी करण्यात आला आहे. गुरुवारी मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पावसाची शक्‍यता वेधशाळेने वर्तवली आहे. 

पुढील पाच दिवस या कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रवास सुरू राहणार आहे. या कालावधीत भरपूर पाऊस, वीजा चमकणे आणि वारा, वादळाही शक्‍यता आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. हवामान अंदाजाकडे लक्ष देऊन सर्वांनी सुरक्षित राहावे, असे आवाहन सहायक मत्स्यव्यवसाय संचालक कार्यालयाचे परवाना अधिकारी मुरारी भालेकर यांनी केले आहे. जिल्ह्यात आज सायंकाळी पावसाला जोरदार सुरूवात झाली. उशिरापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बहुसंख्य भागात जोर कायम होता. 

 संपादन : विजय वेदपाठक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: 'हा डेंजर संघ आहे...' Dhoni सूर्याच्या टीम इंडियाबद्दल स्पष्टच बोलला; मनातील भीतीही सांगितली

Mamata Banerjee's Big Move: पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय; ‘TMC’ने केली घोषणा!

Latest Marathi News Live Update : टेम्पोला धडकल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

Manipur's New CM : युमनाम खेमचंद सिंह असणार मणिपूरचे नवे मुख्यमंत्री!, विधिमंडळ पक्षनेतेपदी झाली निवड

Horoscope News : 'या' राशींच्या अडचणीचा काळ झाला सुरु ! अंगारक योगामुळे करावा लागणार संकटांचा सामना

SCROLL FOR NEXT