WHATS APP  
कोकण

सोशल मीडियावरून समर्थकाला धमकी ; राजापूरात वातावरण तापले

रिफायनरीवरून वातावरण तापले; गोवळमधून पोलिसांत तक्रार

सकाळ वृत्तसेवा

राजापूर (रत्नागिरी) : रिफायनरी प्रकल्पाचे (Refinery project) समर्थन करणाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार आता गोवळ परिसरात सुरू झाले आहेत. अशाच एका व्हॉट्स अॅपग्रुपवरून रिफायनरीचे समर्थन केल्यामुळे नरेंद्र राजाराम जोशी (गोवळ, खालचीवाडी) याने धमकी दिल्याची तक्रार गौरव महेश परांजपे यांनी राजापूर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.

राजापूर तालुक्यातील गोवळ भागात रिफायनरी प्रकल्प होण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरू आहे. या प्रस्तावित रिफायनरीच्या प्रकल्पाची माहिती प्रत्यक्ष घेतली व गावातील काही मंडळींना तो प्रकल्प चांगला आहे, असे प्रबोधन गेले दोन महिने करत आहे. परंतु, मी करत असणारे सकारात्मक काम गावातील काही वाईट विचार करणाऱ्या मंडळींना पटत नाहीत, असे परांजपे यांनी या तक्रार अर्जात म्हटले आहे.

नरेंद्र जोशी व त्याच्या जमावातील व्यक्तींना चिथवण्याचे व मार्गदर्शन करण्याचे काम सत्यजित चव्हाण करीत असल्याचे परांजपे यांनी तक्रार अर्जात नमूद केले आहे. संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी गौरव परांजपे यांनी केली आहे.

मानसिक खच्चीकरण करणारा मेसेज

गोवळ गावातील स्थानिक ग्रामस्थ व मुंबई येथे राहणारे ग्रामस्थ यांचा 'गोवळ माझं गाव' असा व्हॉटस्अॅप ग्रुप आहे. त्यामध्ये सध्या मुंबईला राहणारे नरेंद्र राजाराम जोशी हे देखील आहेत. या ग्रुपवर सर्व सदस्य नेहमी कोणत्या ना कोणत्या पोस्ट शेअर करीत असतात. सोमवारी (ता. २) नरेंद्र जोशी यांनी, मला दुखावण्याच्या हेतूने तसेच माझे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी व मला बदनाम करण्यासाठी 'आमच्या वाडीत कोण जर आला ना विचारायला तर कपडे काढून मारीन' असा मेसेज केल्याचे परांजपे यांनी तकार अर्जात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nasrapur Crime News: चिमुकलीवर लैंगिक अत्याचार व खून प्रकरणी ६५ वर्षीय आरोपीला ७ मे पर्यंत पोलिस कोठडी

CSK vs MI Live: मुंबई इंडियन्सचा वर्ल्ड रेकॉर्ड! चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध ढेपाळले, पण जगात चमकले; भारतीय संघालाही हे नाही जमले...

Success Story : जिद्दीला सलाम! दोन मुलांचा सांभाळ अन् मोलमजुरी करत निशाने केली 12वी उत्तीर्ण; मिळवले ६८.३३% गुण

Judge Suicide: धक्कादायक! न्यायाधीशांनी जीवन संपवलं; मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला, घटनेनं खळबळ

Yerla River Incident : लग्नासाठी आली अन् काळानं घाला घातला! येरळा नदीत पोहण्यास गेलेल्या 20 वर्षीय तरुणीचा बुडून मृत्यू; सात मुलांना पाण्याबाहेर काढण्यात यश

SCROLL FOR NEXT