Barsu Refinery Project esakal
कोकण

Nilesh Rane : उद्धव ठाकरेंच्या बारसू दौऱ्यापूर्वी राणेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, भयानक घटना घडवण्याचा..

बारसू प्रकल्प गेला तर भविष्यात कोकणात कोणताच प्रकल्प येणार नाही. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रचंड राजकीय इच्छाशक्ती पाहिजे.

सकाळ डिजिटल टीम

रिफायनरी प्रकल्पाबाबत भूमिका चिघळवण्यासाठी ठाकरे बारसू येथे येत असतील तर आम्हाला समर्थनार्थ मोर्चा काढावा लागेल.

ओरोस : ‘बारसू रिफायनरी’ (Barsu Refinery Project) कोकणातून जाण्यासाठी कोकणशी काडीचा संबंध नसलेली माणसे प्रयत्न करीत आहेत. शनिवारी (ता.6) माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या होणाऱ्या सभेतील गर्दीचा फायदा घेऊन भयानक घटना घडविण्याचा कट आखला जात आहे. यासाठी बारसू इथं जिलेटीन टीक्स आणल्या गेल्या आहेत, असा दावा भाजप प्रदेश सरचिटणीस नीलेश राणे (Nilesh Rane) यांनी करत याचा पोलिसांनी शोध घ्यावा. आवश्यक माहिती आपण देऊ, असेही ते यावेळी म्हणाले.

सिंधुदुर्गनगरी येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बारसू रिफायनरी प्रकल्पावरून रणकंदन उडालेले असताना प्रकल्प विरोधासाठी माजी मुख्यमंत्री ठाकरे (Uddhav Thackeray) शनिवारी बारसू येथे येत आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. याचा फायदा घेण्यासाठी कोकण प्रांताशी काहीही संबंध नसलेल्या व्यक्ती तेथे साहित्य पुरवीत आहेत, असा दावा राणे यांनी केला.

'माझ्याकडे असलेले पुरावे देण्यास तयार'

मात्र, यामागे उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या पक्षाचा संबंध नसल्याचे राणे म्हणाले. परंतु, यानिमित्त होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन भयानक कृत्य घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे याचा पोलिसांनी तातडीने शोध घ्यावा. यासाठी माझ्याकडे असलेले पुरावे देण्यास तयार आहोत. याबाबत शुक्रवारी (ता.५) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर माहिती सादर करणार असल्याचे यावेळी राणे यांनी सांगितले.

'..तर आम्हाला समर्थनार्थ मोर्चा काढावा लागेल'

ते पुढे म्हणाले, ‘‘बारसू प्रकल्प गेला तर भविष्यात कोकणात कोणताच प्रकल्प येणार नाही. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रचंड राजकीय इच्छाशक्ती पाहिजे. राजकीय नेत्यांनी मैदानात उतरून काम करावे. रिफायनरी प्रकल्पाबाबत भूमिका चिघळवण्यासाठी ठाकरे बारसू येथे येत असतील तर आम्हाला समर्थनार्थ मोर्चा काढावा लागेल. ’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पाऊस! पवई तलाव ओव्हरफ्लो, ७ जलाशयातील पाणीसाठ्याबाबत मोठी अपडेट समोर

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

Jagannath Puri Rath Yatra 2026: कधी आहे जगन्नाथ पुरी रथयात्रा 2026? जाणून घ्या योग्य तारीख, महत्त्व आणि परंपरा

तेजश्री प्रधानला रिप्लेस करणारी अभिनेत्री होणार आई; समुद्रकिनारी फोटोशूट करत दाखवला बेबी बंप, तुम्ही ओळखलंत का?

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

SCROLL FOR NEXT