Refresher Course For Heavy Weight Police Ratnagiri Marathi News  
कोकण

स्थूल पोलिसांचे वजन घटवण्यासाठी 'हा' कोर्स ठरतोय प्रभावी

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - जिल्हा पोलिस दलातील स्थूल कर्मचाऱ्यांचे वजन कमी करण्यास आणि कस वाढविण्यास नवा रिफ्रेशर कोर्स प्रभावशाली ठरत आहे. सोपस्कार म्हणून हा कोर्स न करता पोलिसांचा चालून चालून घाम काढणारा आणि डाएट देऊन तंदुरुस्त शरीरासाठी वेगळा अनुभव देणारा हा कोर्स आहे. गेल्या दोन बॅचमधील कर्मचाऱ्यांनी तसे अभिप्रायदेखील दिले आहेत. 

हा कोर्स केल्यास भविष्यात संबंधित व्यक्तीला व्यायाम आणि संतुलित आहाराची सवय लागणार आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी यामध्ये आमुलाग्र बदल करून त्याची काटेकोर अंमलबजावणी सुरू केल्याचे हे परिणाम आहेत. जिल्हा पोलिस दलामध्ये पारंपरिक पद्धतीने रिफ्रेशर कोर्स होत होते. तळमळीने काहीतरी साध्य करण्याचा उद्देश तडीस जात नव्हता. हा कोर्स होत नव्हता. डॉ. मुढे यांनी हे जवळून पाहिले.

त्यांनी संपूर्ण रूपरेषा पाहिली आणि अनेक बदल केले. शारीरिक कस वाढला आणि वजन कमी झाले तरच त्या कोर्सचा उपयोग होण्याच्या अनुषंगाने डॉ. मुंढे यांनी गेल्या महिन्यापासून प्रत्येक पोलिस ठाण्यातील जास्त वजन असलेले कर्मचारी निवडले.पहिल्या बॅचने या रिफ्रेशर कोर्सचे कौतुक केले. तसे अभिप्राय पोलिस अधीक्षकांना दिले आहेत. त्यामुळे पोलिस दलाचा फिटनेस सुधारण्यास मदत होत आहे. दोन ते अडीच किलो वजन कमी झाले, असे कर्मचाऱ्यांचे मत आहे. 

पोलिस कर्मचाऱ्यांचे तंदुरुस्त शरीर आणि कस वाढविणारा हा कोर्स व्हावा, यासाठी त्यामध्ये अनेक बदल केले. त्याला चांगले अभिप्राय आले आहेत. संतुलित आहार व व्यायामाची सवय लागण्यास मदत होणार आहे. 
- डॉ. प्रवीण मुंढे, 
जिल्हा पोलिस अधीक्षक 

चांगलेच घामटवले जाते.. 

साधारण 25 जणांची ही एक बॅच आहे. पंधरा दिवसाच्या या कोर्समध्ये त्यांना चांगलेच घामटवले जाते. सकाळी सहा वाजता ग्राउंडवर दहा ते बारा किमी वॉकिंग तेही चढावावर करावे लागते. 9 वाजता नाश्‍ता, 10 ते 12 पर्यंत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन, त्यानंतर जेवण आणि अडीच वाजेपर्यंत आराम. त्यानंतर हत्यारे हाताळण्यात दिली जातात. नंतर ग्राउंडवर वर्कआऊट, 5 ला पुन्हा हलका नाश्‍ता, पाच ते साडे सात घरी त्यानंतर साडे सात वाजता पोलिस खानावळीत डाएट दिले जाते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saurabh Das Contempt Case : 'सीजेपी'चे प्रवक्ते सौरभ दास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! मानहानी आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वाढला न्यायालयीन फेरा, काय आहे प्रकरण?

Khade Hanuman: नव्या जागेवर मंदिर तयार पण हनुमानजी जागचे हलेनात; उज्जैनमध्ये दक्षिणमुखी अन् उत्तरमुखी समस्या काय आहे?

Duleep Trophy Winner: ईशान किशनच्या संघाने जिंकले विजेतेपद! तिलक वर्माच्या संघाविरुद्ध फायलनमध्ये केलेल्या १००० हून अधिक धावा

Tukaram Mundhe FDA Rules : गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश, कसा भरायचा अर्ज?

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात गैरहिंदू ठेकेदारांना कामे देऊ नका; भाजप गटनेत्याच्या पत्राने खळबळ

SCROLL FOR NEXT