releasing the snake he took out the eggs by mouth and then the swallowed chicken in sindhudurg 
कोकण

कोंबडी नव्हे आधी अंडच ; त्याने आधि केल्या कोंबड्या फस्त अन्....

सकाळ वृत्तसेवा

कोलझर (सिंधुदुर्ग) : कोंबडी आधी की अंड या प्रश्‍नाचे उत्तर आज येथे पकडलेल्या अजगराने दिले. खुराड्यात घुसून कोंबड्या फस्त केल्यानंतर पकडलेल्या या अजगराला सोडल्यानंतर त्याने तोंडावाटे आदी अंडे आणि नंतर गिळलेली कोंबडी बाहेर काढली.


पावसाळा सुरू झाल्याने भक्ष्यासाठी वस्तीत अजगर घुसण्याचे प्रकार वाढले आहेत. येथील दीपक पास्ते यांच्या घराजवळच्या खुराड्यात आज पहाटे अजगर घुसला. त्याने कोंबडी आणि आत असलेली अंडी फस्त केली; मात्र सुस्तावल्याने तो आतच पडून राहिला. सकाळी पास्ते यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी स्थानिकांना याची कल्पना दिली. महादेव नाईक आणि रोशन नाईक यांनी मोठ्या शिताफिने या अजगराला पकडले. कोंबड्या खाल्ल्याने त्याचे पोट भरले होते.

अजगराला पकडले  गिळलेले भक्ष्य काढले बाहेर


या प्रकाराची माहिती वन कर्मचार्‍यांना देण्यात आली. काही वेळातच वनरक्षक कोल्हे दाखल झाले. त्यांच्या उपस्थितीत तेजस देसाई, अवधुत महाजन, विष्णू नाईक, सत्यवान नाईक आदींनी त्याला नैसर्गिक अधिवासात नेले. तेथे सोडले असता त्याने गिळलेले भक्ष्य बाहेर काढायला सुरवात केली. सगळ्यात आधी अख्खे अंडे व त्या पाठोपाठ कोंबडी बाहेर आली. सुमारे आठ फूट लांब असलेल्या या अजगराने दोन कोंबड्या गिळल्या होत्या. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA 5th T20I: लखनौचा सामना 'धुक्यात' हरवला; आता भारत-दक्षिण आफ्रिका पाचवा सामना कधी व कुठे होणार, ते पाहा...

Nagpur News: डागा रुग्णालयात नवजात शिशूचा मृत्यू, नातेवाईकांचा गोंधळ, वैद्यकीय अधीक्षकांचे चौकशीचे आदेश

Viral Video: 'अरे पैसा नही चाहिये', रेल्वे स्टेनशवरील बाप-लेकीची गोड व्हिडिओ व्हायरल

पिंजऱ्यात शिकार, जंगलात राज! वाघीण 'तारा'ची सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दणक्यात एन्ट्री, शास्त्रीय पद्धतीने कशी राबवली 'सॉफ्ट रिलीज'?

Atal Bihari Vajpayee : राष्ट्रपतिपद स्वीकारण्यास वाजपेयींचा होता नकार; तत्कालीन माध्यम सल्लागार अशोक टंडन यांच्या पुस्तकात दावा

SCROLL FOR NEXT