कोकण

मालवण पोलिसांतर्फे रेस्क्यू टिमचा सत्कार

CD

87659

मालवण पोलिसांतर्फे
रेस्क्यू टिमचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ३ : येथील दांडीलगतच्या मोरयाचा धोंडा या ठिकाणी समुद्रात बुडत असलेल्या पर्यटकाला वाचविणाऱ्या येथील रेस्क्यू टीमच्या सदस्यांचा पोलिस प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला. येथे काही दिवसांपूर्वी पर्यटन सफरीवर आलेल्या सोलापूर येथील काही पर्यटक मोरयाचा धोंडा येथील समुद्रात स्नान करण्यासाठी उतरले होते. यामध्ये यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने त्यातील दीपक मबुकर हा तरुण समुद्रात बुडू लागला.
या घटनेची माहिती समजताच मालवणातील रेस्क्यू टीमचे सदस्य सुजित मोंडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धाव घेत समुद्रात बुडत असलेल्या दीपक याला बाहेर काढून येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. रेस्क्यू टीमच्या सतर्कतेमुळे दीपक याचे प्राण वाचले. याची दखल घेत पोलिस प्रशासनातर्फे पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या हस्ते रेस्क्यू टीमचे सदस्य सुचित मोंडकर, सन्मेश परब, अक्षय मेथर, प्रतीक चांदेरकर, सचिन आडकर, भावेश तोडणकर, छगन सावजी, वरद तोडणकर, भावेश ढोके, पारस मालंडकर यांचा सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipith Highway Protest : शक्तिपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरातून पुन्हा एल्गार, सतेज पाटील, राजू शेट्टींच्या सोबतीने शेतकरी ताकद दाखविणार

Fan Safety Tips : घरातला पंखा ठरू शकतो धोकादायक! साधी चूक अन् घर जळून होईल खाक; उन्हाळा सुरू होण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' 2 गोष्टी

Mumbai Local: मुंबईकरांचा खोळंबा होणार, लोकलचे वेळापत्रक बदलणार, कोणत्या मार्गांवर आणि कधी? जाणून घ्या...

Pune Police Recruitment : पोलिस भरतीत ‘शॉर्टकट’चा स्फोट! शक्तीवर्धक पेय घेताच उमेदवाराचा मैदानावर धिंगाणा, थरारक क्षणांनी सर्वच शॉक

Bullet Rider Assaults Traffic Police in Solapur : लायसन्स, नंबरप्लेट नाही, मॉडिफाइड सायलेन्सर, तरीही पोलिसाला खल्लास करण्याची दिली धमकी

SCROLL FOR NEXT