research of oil creation with help of mango seeds in ratnagiri rajapur 
कोकण

आंब्याच्या कोयांपासून होते तेलनिर्मिती ; कोकणचा ऋषिकेश करतोय संशोधन

राजेंद्र बाईत

राजापूर (रत्नागिरी) : हापूसच्या विक्रीतून कोकणात कोट्यवधींची उलाढाल होते. आंबा खाल्ल्यानंतर बाटा (कोय) फेकून दिल्या जातात. या आंब्याच्या बाटांचा पुनर्वापर होऊन त्याद्वारे उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण करण्याच्या अनुषंगाने तालुक्‍यातील खडकवलीचे सुपुत्र ऋषिकेश गुर्जर हा तरुण संशोधन करीत आहे. त्यामध्ये आंब्याच्या बाटांपासून परदेशामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असलेली तेलनिर्मिती करण्यासह त्याचा विविध पदार्थांच्या निर्मितीमध्ये कसा उपयोग होईल, या दृष्टीने संशोधन सुरू आहे.

तालुक्‍यातील खडकवलीतील ऋषिकेशचे माध्यमिकपर्यंतचे शिक्षण भू हायस्कूल. त्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण गोडे-दाते कनिष्ठ महाविद्यालय, राजापूर येथे झाले. त्यानंतर, त्याने बी. टेक सावर्डे येथील सह्याद्री शिक्षणसंस्थेतून, तर एम. टेक औरंगाबाद येथे पूर्ण केले आहे. सध्या तो उत्तरप्रदेश राज्यातील सॅम हिगिनबॉटम कृषी, औद्योगिक आणि विज्ञान महाविद्यालय, प्रयागराज (sam higginbottom university of agriculture, technology and sciences, prayagraj) येथे शिक्षण घेत आहे. या ठिकाणी शिक्षक असताना त्याने जॉन डायमंड राज आणि डॉ. प्रदीप हळदवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न तंत्रज्ञान या विषयांतर्गंत आंब्याच्या बाटांपासून तेलनिर्मिती करण्यावर पीएच.डी.साठी संशोधन सुरू केले आहे. यामध्ये लाकडी घाण्यात बाटा टाकून त्यातून तेल काढले जाते.

एका किलोच्या बाटांमधून सर्वसाधारणपणे २० टक्‍के तेल निघते. परदेशात या तेलाला किलोला अडीच हजार रुपये दर आहे. तिकडे याचा वापर चॉकलेट केकमध्ये करण्यात येतो.
कोकणच्या हापूसला परदेशात मोठी मागणी आहे. यामधून दरवर्षी कोट्यवधीची उलाढाल होते. आंब्यापासून आमरस, लोणचे, विविध पदार्थ बनविले जातात. आंबा खाल्ल्यानंतर फेकून देण्यात येणाऱ्या वा फारसा उपयोग न केल्या जाणाऱ्या बाटांचा नवीन झाडाची रुजवात करण्याशिवाय अन्य वापर केला जात नाही. या बाटांचा वापर कसा करता येईल, याचा अभ्यास सुरू आहे. बाटांपासून तेलनिर्मिती करण्यावर ऋषिकेश संशोधन करत आहे. विविध पदार्थ निर्मितीत वापरल्या जाणाऱ्या अन्य तेलाऐवजी बाटापासून तयार केलेल्या तेलाचा वापर करणे शक्‍य आहे का, तसेच ते तेल खाण्यायोग्य आहे का? या दृष्टीने संशोधन सुरू आहे. वर्षभरात ते पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले. याद्वारे उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण करणे शेतकऱ्यांसह बागायतदारांना शक्‍य होईल.

जिल्ह्यातील क्षेत्र 

जिल्ह्यात आंब्याचे क्षेत्र ६५ हजार १०९ हेक्‍टर आहे. त्यामधून १ लाख ५२ हजार ५०० मेट्रिक टन उत्पादन मिळते. हेक्‍टरी उत्पादकता २.५० टन इतकी आहे.

नानकटाईत डालड्याऐवजी तेलाचा उपयोग

स्थानिक पातळीवरील बेकऱ्यांमध्ये नानकटाईज्‌ तयार केल्या जातात. त्या तयार करण्यासाठी अनेक वेळा डालडाचा वापर केला जातो; मात्र, आंब्याच्या बाटांपासून तयार करण्यात येणाऱ्या तेलाचा नानकटाई तयार करण्यासाठी डालडाऐवजी त्याचा उपयोग कसा करता येईल? या दृष्टीने संशोधन करत असल्याचे ऋषिकेश यांनी सांगितले. त्या दृष्टीने यशस्वी संशोधन झाल्यास स्थानिक पातळीवर आंब्याच्या बाटांच्या तेलाला मोठ्या प्रमाणात मागणी होऊन त्यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होण्याचा अंदाजही त्याने व्यक्‍त केला आहे.

"हापूस आंब्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र, बाटांचा फारसा उपयोग होत नसल्याने त्या फेकून दिल्या जातात. अशा बाटांचा पुनर्वापर होऊन त्याद्वारे उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण करण्याच्या दृष्टीने संशोधन सुरू आहे. त्यामध्ये आंब्याच्या बाटांपासून तेलनिर्मिती करण्याचे संशोधन सुरू आहे. त्यातून बाटांचा पुनर्वापर होऊन स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीही होईल."

 - ऋषिकेश गुर्जर, संशोधक
 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND, 1st T20I: टीम इंडियाचं ठरलंय... खेळपट्टी कशीही असू दे 'हे' तीन गोलंदाज खेळवणारचं! कर्णधार सूर्यकुमारने सांगितला प्लॅन

Weight Loss Secrets by Rujuta Diwekar: डाएट नव्हे, स्मार्ट मील प्लॅन! करीनाची न्यूट्रिशनिस्ट सांगते वजन कमी करण्याचं रहस्य

Latest Marathi News Live Update : ऑलिम्पिक महासचिव नामदेव शिरगावकर याच्यावर गुन्हा दाखल

Pune News : सर्वात कमी दराने ठेकेदारांना काम करावे लागेल; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आयुक्तांची भूमिका

Jalgaon Crime : एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; हद्दपारीचा आदेश झुगारणाऱ्या तेजस सोनवणेसह तिघांना बेड्या

SCROLL FOR NEXT