Chair sakal
कोकण

दाभोळ : आरक्षण जाहीर; दापोलीला महिला नगराध्यक्ष

आरक्षण जाहीर; कोणाला मिळणार संधी? इच्छुकांचा हिरमोड

सकाळ वृत्तसेवा

दाभोळ : दापोली नगरपंचायतीचे नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले असून, सर्वसाधारण गटातील महिला आता नगराध्यक्ष होणार असल्याने अनेक पुरुष नगरसेवकांचा हिरमोड झाला असून, त्यांना आता अडीच वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे.

दापोली नगरपंचायतीची निवडणूक चांगलीच गाजली होती. शिवसेना व राष्ट्रवादी यांची या निवडणुकीत आघाडी झाली होती. या आघाडीने १४ जागा मिळवून नगरपंचायतीवर वर्चस्व निर्माण केले होते. या निवडणुकीत शिवसेनेची धुरा आमदार योगेश कदम यांच्याकडे न देता, ती माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्याकडे देण्यात आली होती. सेनेच्या वतीने माजी आमदार सूर्यकांत दळवी तर राष्ट्रवादीच्या वतीने माजी आमदार संजय कदम यांनी पक्षाच्या वरिष्ठांच्या आदेशाने जागा वाटप केले होते. त्यात शिवसेनेला ८ तर राष्ट्रवादीला ९ जागा देण्यात आल्या होत्या. आमदार योगेश कदम यांच्या समर्थकांना शिवसेनेच्या जागा वाटपात स्थान न मिळाल्याने त्यांनी शिवसेवा विकास आघाडी स्थापन करून ही निवडणूक लढविली होती. त्यामुळे या निवडणुकीत चांगलीच रंगत आली होती.

दरम्यान, शिवसेनेच्या ममता मोरे, शिवानी खानविलकर व नौशीन गिलगिले या नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. त्यामधील ममता मोरे यांना नगराध्यक्षपद मिळेल, अशी चर्चा सुरू आहे. यासंदर्भात शिवसेनेचे तालुकाध्यक्ष हृषीकेश गुजर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी नगराध्यक्ष आघाडीचा होईल, वरिष्ठ निर्णय घेतील, त्याच पक्षाचा नगराध्यक्ष होईल, असे सांगितले.

महिला नगरसेवकांमध्ये खुशीचे वातावरण

निवडणूक निकालानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीचे १४ उमेदवार निवडून आले होते. त्यात शिवसेनेचे सहा, तर राष्ट्रवादीचे आठ उमेदवार विजयी झाले होते. भाजपचा एक उमेदवार निवडून आला होता. या निवडणुकीत नऊ महिला, तर आठ पुरुष उमेदवार निवडून आले आहेत. आज जाहीर झालेल्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण महिलांसाठी आरक्षित झाल्याने महिला नगरसेवकांमध्ये खुशीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीतून सहा महिला नगरसेवक म्हणून निवडून आल्या असून, शिवसेना व राष्ट्रवादीतून प्रत्येकी तीन महिला निवडून आल्या आहेत. शिवसेवा विकास आघाडीच्या दोन, तर भाजपची एक महिला नगरसेवक निवडून आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

Monsoon Update: मान्सूनचा वेग मंदावला! देशातल्या १२ राज्यांतील ३१५ जिल्ह्यांवर दुष्काळाचे भीषण सावट

Tankerman Salman Pathan : गावचा पाणी पुरवठा झाला कमी; अगरवाडगावची तहान भागवतोय ‘टँकरमॅन’ सलमान

SCROLL FOR NEXT