reservation of gram panchayat sarpanch start from 15 december in chiplun 83 villeges in ratnagiri
reservation of gram panchayat sarpanch start from 15 december in chiplun 83 villeges in ratnagiri 
कोकण

ग्रामपंचायत निवडणुकींचा धुरळा उडणार ; पदाधिकाऱ्यांचे सरपंच आरक्षणाकडे लक्ष

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण (रत्नागिरी) : तालुक्‍यातील ८३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकींचा रणसंग्राम पुढील दीड - दोन महिन्यात रंगणार आहे. यासाठी तालुक्‍यातील ८३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण १५ डिसेंबरला जाहीर होणार आहे. त्यामुळे तालुक्‍यातील खेर्डी, सावर्डेसह ८३ ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांचे सरपंच आरक्षणाकडे लक्ष लागलेले आहे.

तालुक्‍यातील ८३ ग्रामपंचायतीची पंचवार्षिक मुदत जुलैमध्ये संपली आहे; मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर या निवडणुका अनिश्‍चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आल्या. दरम्यान, ८३ ग्रामपंचायतींवरील पदाधिकाऱ्यांची मुदत संपल्याने तिथे प्रशासकांची नियुक्ती झाली आहे. गेल्या चार, पाच महिन्यापासून प्रशासक ग्रामपंचायतींचा कारभार पाहत आहेत.

तालुक्‍यातील खेर्डी, सावर्डे, रामपूर, कोंडमळा, कापसाळ, दळवटणे, मोरवणे, कळबंस्ते, वालोपे, तिवरे, कोंडफणसवणे, कोंढे, पाचाड, मिरजोळी, आदी ८३ ग्रामपंचायतीत निवडणुका होणार आहेत. दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर १ डिसेंबरला मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. यावर हरकती मागविण्यात आल्या आहे. पुढील आठवड्यात हरकतीवर सुनावणी झाल्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. २०२१ ते २०२५ या कालावधीसाठी सरपंच आरक्षण जाहीर करण्याचे आदेश तहसीलदारांना देण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सोशल डिस्टन्सचा फज्जा उडणार नाही, याचीही दक्षता घेण्याची सूचना केली आहे.

निवडणुकीत उतरायचे की नाही हे ठरणार

तालुक्‍यातील काही गावात सरपंच पदाच्या आरक्षणावर निवडणुकीत उतरायचे की नाही, हे ठरणार आहे. गेल्या २० ते २५ वर्षात संबंधित गावात पडलेले सरपंच पदाच्या आरक्षणाचा मागोवा घेत आरक्षण सोडत निघण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे खेर्डी, सावर्डेसारख्या मोठ्या गावांचे या सरपंच आरक्षण सोडतीकडे विशेष लक्ष राहणार आहे. खेर्डीत गेल्या पाच वर्षासाठी सरपंचपद खुल्या गटासाठी राखीव होते. त्यामुळे आता नेमके कोणत्या गटासाठी आरक्षण राहणार? याकडे खेर्डीवासीयांचे लक्ष लागलेले आहे.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकली; चेन्नईला चेन्नईत मात देण्यासाठी सज्ज

Buss Accident : उत्तर प्रदेशमध्ये भीषण बस अपघात; ट्रकच्या वेगाने बस कापून निघाली, सात जणांचा मृत्यू

T20 WC 2024 India Squad : विकेटकिपर निवडणं UPSC क्रॅक करण्यापेक्षाही झालं अवघड; 'यांनी' निवडसमितीची डोकेदुखी वाढवली

Uttarakhand Forest Fire : उत्तराखंडमध्ये जंगलाला भीषण आग! वणव्यांमुळे ३३.३४ हेक्टरवरील झाडे जळून खाक

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

SCROLL FOR NEXT