Restrictions on sending hapus to England relaxed Possibility of increase in exports 
कोकण

हापूस इंग्लंडमध्ये पाठवण्यासाठी निर्बंध शिथिल; निर्यातीत  वाढ होण्याची शक्‍यता 

राजेश कळंबटे

रत्नागिरी - इंग्लंडमध्ये निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तूंवरील बंधने शिथिल केली असून त्यात हापूसवरील उष्णजल प्रक्रियेचा समावेश आहे. त्याचा फायदा निर्यातवाढीला होणार असून कोकणातील हापूसच्या निर्यातीत 30 ते 40 टक्‍के वाढ होईल, अशी आशा आहे. हा कोकणातील बागायदारांना दिलासा आहे. तसेच येत्या चार दिवसात रत्नागिरीतून पहिली शिपमेंट इंग्लंडला रवाना होणार आहे. 

देशभरातून दरवर्षी विविध प्रकारच्या आंब्याची 50 हजार मेट्रिक टन एवढी निर्यात वेगवेगळ्या देशांमध्ये केली जाते. यामध्ये इंग्लंडला होणाऱ्या 3 ते 4 हजार मेट्रिक टन निर्यातीत कोकणातील हापूस 20 टक्‍के आहे. दरवर्षी सरासरी 600 मेट्रिक टन हापूस इंग्लंडमध्ये जातो. युरोपियन देशांसाठी उष्णजल प्रक्रिया आवश्‍यक होती.

फळमाशीवर नियंत्रणासाठी 48 अंश सेल्सिअस तापमानाला 60 मिनिटे फळ पाण्यात ठेवून ही प्रक्रिया होते. त्यासाठी लासलगाव आणि वाशीसह रत्नागिरीतील पॅकहाउसमध्ये सुविधा आहे. युरोपियन देशांच्या समुहातून इंग्लंड बाहेर पडल्यानंतर विविध वस्तूंच्या निर्यातीवर यंदा शिथिलता आणली गेली. त्यानुसार भारतामधून निर्यात होणाऱ्या 16 वस्तूंचा समावेश आहे. याचा फायदा भारतामधून निर्यात होणाऱ्या आंब्यासह हापूसला होणार आहे. 

उष्णजल प्रक्रियेमुळे पातळ साल असलेल्या हापूसचा दर्जा घसरत होता. यावर पणनने अभ्यास करून निकष बदलाची मागणी केली होती. त्यावर निर्णय झालेला नाही. परंतु इंग्लंडने निर्बंधात दिलेल्या शिथिलतेचा फायदा अनेक बागायतदारांना होणार आहे; मात्र आंब्याचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी शासनाकडून प्रोटोकॉल निश्‍चित करण्याची मागणी व्यावसायिकांकडून होत आहे. 

फायटो सर्टिफिकेट अत्यावश्‍यक 
इंग्लंडला आंबा पाठवताना पॅक हाउसमध्ये होणाऱ्या सर्व प्रक्रिया केल्या जातील. त्या फळाची प्रतवारी करणे, वॉशिंग, ब्रशिंग आणि कुलिंग केले जाईल. त्याचबरोबर निर्यातीसाठी शासकीय परवानगी असलेल्या पॅक हाउसचे फायटो सर्टिफिकेट अत्यावश्‍यक केले आहे. 

इंग्लंडने बंधने शिथिल केल्यामुळे त्याचा फायदा हापूसच्या निर्यातवाढीला होणार आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्याचे काम सुरू आहे. 
- भास्कर पाटील, सर व्यवस्थापक, पणन 

इंग्लंडमध्ये भारतामधून येणाऱ्या आंब्यांचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी शासनाने विशिष्ट प्रोटोकॉल ठरवले पाहिजे. सरसकट आंबा बाजारात आला तर दर्जावर आणि दरावर परिणाम होऊ शकतो. 
- तेजस भोसले, व्यवसायिक, लंडन 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pilbhit Tiger Reserve: व्याघ्र प्रकल्पात विकेंड सफारी महागली; शनिवार-रविवारचे तिकीट २०० रुपयांवर, काय आहे कारण ?

Team India Live Streaming: सुपर संडे! भारताचे दोन मोठे सामने, Asia Cup Final अन् अफगाणिस्तानविरुद्ध रंगणार टी२०; कुठे पाहाणार?

Ukadiche Modak Recipe: केशराचा सुगंध, नारळ-गुळाची गोडी आणि 'हा' एक पदार्थ… बाप्पासाठी असे बनवा स्पेशल उकडीचे मोदक!

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

SCROLL FOR NEXT