NDRF ANI
कोकण

तळीये दुर्घटना: ग्रामस्थांच्या विनंतीनंतर प्रशासनानं थांबवली बचाव मोहिम

रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली माहिती

Amit Ujagare (अमित उजागरे)

रायगड जिल्ह्यातील महाड येथील तळीये गावात झालेल्या दरड दुर्घटनेप्रकरणी गेल्या चार दिवसांपासून जिल्हा प्रशासनाकडून बचाव मोहिम सुरु होती. पण आता स्थानिकांच्या विनंतीनुसार ही मोहिम थांबवण्याचा निर्णय स्थानिकांच्या विनंतीनंतर प्रशासनानं घेतला आहे. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना ही माहिती दिली. (resucue operation of Taliye lanslide was stopped by administration aau85)

जिल्हाधिकारी चौधरी म्हणाल्या, "या दुर्घटनेत आत्तापर्यंत ५२ मृतदेह सापडले आहेत तर अद्याप ३२ लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली असण्याची शक्यता आहे. इथल्या मृत व्यक्तींचे नातेवाईक आणि बेपत्ता लोकांच्या नातेवाईकांसह तळीये गावचे सरपंच आणि स्थानिक आमदारांनी जिल्हा प्रशासनाला सूचना केली की, मृतदेह काढताना त्यांची विटंबना होत आहे. मृतदेहांचे हात-पाय असे विविध अवयव निखळून येत आहेत. या ठिकाणी खूपच खोल चिखल आहे. चार ते सहा फूट खोदल्यानंतर मृतदेह सापडत आहेत, अशा वेळी मृतदेहांची दुरावस्था झालेली असते म्हणून मृतदेहांची विटंबना होऊ नये यासाठी ही शोध मोहिम थांबवण्यात यावी. तसेच जे बेपत्ता लोक आहेत त्यांना मृत घोषीत करण्यात यावं आणि त्याच ठिकाणी त्यांना श्रद्धांजली देण्यात यावी, अशी मागणीही इथल्या नागरिकांनी केली आहे."

"दरम्यान, मी त्यांना समजावूनही सांगितलं की, जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न हे जोपर्यंत शेवटचा मृतदेह निघत नाही तोपर्यंत सुरुच असतात. कोणीतरी जिवंत सापडू शकेल, हा यामागचा उद्देश असतो. कारण इतर अनेक दुर्घटनांमध्ये ३६ आणि १९ तासांनंतर वृद्ध आणि लहान मुलंही ढिगाऱ्याखालून जिवंत सापडलेले आहेत. पण त्यानंतरही इथल्या सर्व नागरिकांची आणि लोकप्रतिनिधींनी हे बचावकार्य थांबवण्यात यावं, अशी विनंती जिल्हा प्रशासनाकडं केली आहे. उद्या याची सर्व कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली जाईल," असंही जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी स्पष्ट केलं.

ग्रामस्थ काय म्हणतात?

तळीये गावतील बचाव मोहिम थांबवण्याचा उद्देश स्पष्ट करताना एका ग्रामस्थानं सांगितलं की, "या बचावकार्यात मृतदेहांची विटंबना होत आहे. मृतांच्या शरिराचे विविध अवयव वेगळे होत असल्यानं ग्रामस्थांनी प्रशासनाला ही बचाव मोहिम थांबवण्यात यावी अशी विनंती केली. आत्तापर्यंत ४८ ते ७२ तास झाले तरी कोणीही जिवंत सापडलेलं नाहीए. आमच्या कुटुंबातील लोक या दुर्घटनेत मृत्यू पावलेत त्यामुळं आम्ही ग्रामस्थांनी त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करताना त्यांच्या शरीराची विटंबना होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Silver Price Impact: चांदी ठरली गेमचेंजर! या उद्योगपतीची कोट्यवधींची कमाई; चांदीचे भाव वाढल्याने कंपनीचे शेअर्स रॉकेटसारखे झेपावले

रेखाने का केलेलं मुकेश अग्रवालशी लग्न? मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, 'तिच्या डोक्यात फक्त...

Ichalkaranji Election : महापालिका निवडणूक जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग; भाजप-मविआकडून इच्छुकांच्या मुलाखती सुरू

Latest Marathi News Live Update : महायुती करायची असेल तर राष्ट्रवादीला १५ टक्के जागा हव्यातच; अजित पवारांच्या नेत्याचा इशारा

RTO Action: ओला, उबेर, रॅपिडोवर आरटीओचा छापा; नियम भंगाची दंडात्मक कारवाई!

SCROLL FOR NEXT