revenue department officers ignores the sand land in sindhudurg 10 days deadline given to officers
revenue department officers ignores the sand land in sindhudurg 10 days deadline given to officers 
कोकण

महसूल अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडीत

सकाळ वृत्तसेवा

मालवण (सिंधुदुर्ग) : तालुक्‍यात कर्ली व कालावल या दोन्ही खाडीपात्रात अनधिकृत वाळू उपसा दिवसरात्र सुरू आहे. महसूल अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या या वाळू उपशामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. ग्रामस्थांच्या तक्रारींची दखल जिल्हा प्रशासनही घेत नसल्याचे चित्र आहे. महसूल प्रशासनाने येत्या आठ दिवसांत कठोर कारवाई करत अनधिकृत वाळू उपसा व वाहतूक बंद न केल्यास १० नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा आणण्याचा इशारा मनसे सरचिटणीस, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिला आहे.

या अनधिकृत वाळू व्यावसायिकांना मोक्का लावता येईल का, याबाबत कायद्देशीर सल्ला घेऊन प्रसंगी न्यायालयात जाणार असल्याचे उपरकर यांनी स्पष्ट केले. येथे मनसे पदाधिकारी विल्सन गिरकर यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत उपरकर यांनी अनधिकृत वाळू व्यावसाईकांविरोधात आक्रमक भूमिका मांडली. आंबेरी, देवली येथील वाळू उपसा येथील फोटो, व्हिडीओ यावेळी प्रसिद्ध करण्यात आले.

यावेळी आंबेरी ग्रामस्थ किशोर वाक्कर, मनोज वाक्कर, बाबल मांजरेकर, दीपक चव्हाण, सदानंद गोरे, दिलीप पाटणकर, उल्हास वाक्कर, आप्पा मांजरेकर यांच्यासह मनसे मालवण तालुकाध्यक्ष विनोद सांडव, माजी मनविसे जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर, तालुका सचिव विल्सन गिरकर, सचिन गावडे, प्रणव उपरकर उपस्थित होते.

उपरकर म्हणाले, ‘‘खाडी पात्रात दररोज सुमारे ८० होड्यांच्या माध्यमातून दिवसरात्र वाळू उपसा सुरू आहे तर १०० पेक्षा जास्त डंपरद्वारे वाळू वाहतूक सुरू आहे. पोलिस, महसूल कर्मचारी, तहसीलदार, प्रांत, मायनिंग ऑफिसर यांनी डोळ्यांवर पट्टी बांधली आहे. महसूल कर्मचाऱ्यांच्या हप्तेबाजीतून वाळूचा खेळ सुरू आहे. अनधिकृत वाळू व्यवसाय येत्या आठ दिवसात बंद झाला पाहिजे. महसूल अधिकाऱ्यांनी गाडी नाही, फोन बंद ही कारणे न सांगता धडक कारवाई करावी.’’

परप्रांतीय जिल्ह्यात दाखल

उपरकर म्हणाले, ‘‘वाळू उपसा करण्यासाठी अनधिकृत पद्धतीने परप्रांतीय कामगार मोठ्या संख्येने मालवण तालुक्‍यातील अनेक खाडी किनारपट्टी गावांत दाखल झाले आहेत. हे कामगार कोणत्या कामासाठी कोणाकडे आलेत याची नोंद ओळखपत्रसह पोलिस प्रशासनाकडे होणे गरजेचे आहे. तसे न करता अनधिकृत वाळू उपसा करण्यासाठी वाळू कामगार आणले जात असतील तर अशा परप्रांतीय कामगारांना मनसे हाकलून लावणार आहे.’’

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', चेन्नईच्या थालावर भडकला मुंबईचा माजी कर्णधार

Latest Marathi News Update : झारखंडमध्ये ईडीचे छापे, मंत्र्याच्या कर्मचाऱ्याकडून करोडोंची रोकड जप्त

Bajrang Punia : नाडाकडून बजरंग पुनिया निलंबित नमुना; चाचणीला नकार,कुस्ती संघटना ‘वाडा’शी संपर्क साधणार

Aerobic Exercise : वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी करा ‘हे’ एरोबिक व्यायाम प्रकार, मानसिक अन् शारिरीक आरोग्य राहील तंदूरूस्त

Pune News : क्रिकेटच्या चेंडूने घेतला होतकरू खेळाडूचा बळी! अवघड जागी चेंडू लागल्यामुळे ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यु

SCROLL FOR NEXT