कोकण

कनेडी पंचक्रोशीत भातपेरणीला प्रारंभ

CD

88967

कनेडी पंचक्रोशीत भातपेरणी

दमदार पावसाचा आधार ः यांत्रिकी शेतीवर भर

सकाळ वृत्तसेवा
कनेडी, ता. ९ ः परिसरात दमदार पाऊस झाल्याने खरीप हंगामातील भातपेरणीला सुरवात झाली आहे. शेतकरी संकरित आणि सुधारित भाताचे बियाणे पेरणी करीत आहेत. एकूणच, दमदार पावसामुळे बळीराजा सुखावला असून पेरणीसाठी शेतशिवारं गजबजल्याचे दिसते.
गेल्या काही वर्षांपासून यांत्रिक शेतीवर भर देण्यात येत आहे. त्यामुळे पॉवर टिलरचा वापर नांगरणीसाठी होत असल्याचे दिसते. भाताचे वाफे मशागत करून तयार करण्यात आले आहेत. पावसाने यंदा उशिरा हजेरी लावली. तेव्हा दोन दिवसांपासून भातपेरणी सुरू झाली आहे. वीस दिवसांनंतर रोप काढणासाठी तयार होणार आहेत. दोन दिवस सतत पाऊस कोसळत असल्याने शेतशिवारात पाणी साचले आहे. त्यामुळे भातपेरणीची कामे रखडली होती. मात्र, आता वरुणराजाने साथ दिल्यामुळे शेतकरी कामाला लागल्याने शेतशिवारे गजबजली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune District News: वसतिगृहातून तीन अल्पवयीन विद्यार्थी गायब; १८ दिवस उलटूनही ठावठिकाणा नाही, जुन्नर पोलिसांकडून शोध सुरू

Pune FDA Action: पुण्यात FDAची कारवाई, भूम-वाशीतील खवा-पेढा विक्रेते रस्त्यावर; आमदार तानाजी सावंतांकडून प्रश्नाची दखल

रविवारी गुरुचा अश्लेषा नक्षत्रात प्रवेश; 'या' ७ राशींच्या आयुष्यात येणार सुख-समृद्धी

Nilanga Drought: निसर्गाची अवकृपा अन् कृषी विभागाची आकडेवारी; निलंग्यात खरीप पिकांचे १०० टक्के नुकसान, अहवालात ७० टक्केच नोंद

Latest Marathi News Update : शिरपूर तालुक्यात बिबट्याची दहशत; झोपडीत झोपलेल्या महिलेवर हल्ला

SCROLL FOR NEXT