Parshuram Ghat esakal
कोकण

Parshuram Ghat : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दरडी कोसळण्याचा धोका; 'या' मार्गावरुन एकेरी वाहतूक सुरू

संरक्षक भिंत नसल्याने हे दगड रस्त्यावर येऊन अपघाताची शक्यता आहे.

सकाळ डिजिटल टीम

या ठिकाणी मुंबईकडे जाणारा मार्ग येथील भाग खचल्यामुळे बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे.

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील (Mumbai-Goa National Highway) परशुराम घाटातील (Parashuram Ghat) चौपदरीकरणाचे काम पूर्णत्वास गेले असले तरी येथील धोका मात्र कायम आहे. काही दिवसांपूर्वीच येथील दरडीकडेचा मातीचा भराव व संरक्षक भिंत कोसळण्याची घटना घडली होती. आतातर काही ठिकाणी डोंगर भागातील भलेमोठे दगड कोसळण्याच्या स्थितीत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

येथे संरक्षक भिंत नसल्याने हे दगड रस्त्यावर येऊन अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग विभाग व ठेकेदार कंपनी यांनी या ठिकाणी तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे. परशुराम घाटातील पेण कार्यकारी अभियंता यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या भागातून अतिवृष्टी काळात मोठमोठे दगड खाली येऊन अपघात होण्याची दाट शक्यता आहे.

या ठिकाणी मुंबईकडे जाणारा मार्ग येथील भाग खचल्यामुळे बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे. या ठिकाणी संरक्षक भिंत बांधलेली नाही. डोंगरामध्ये खोदकाम करताना टप्पेही दिलेले नाहीत. आतापर्यंतच्या पावसात हे दगड मुक्त झाले असल्याने धोका वाढला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baby Trafficking Case: चार वेळा विकलेले एक महिन्याचे बाळ तेलंगणमधून परत ताब्यात; संभाजीनगर पोलिसांनी बाळ विक्री रॅकेटचा पर्दाफाश

Uttarakhand: उत्तरकाशीत पावसाचे थैमान; ८० ट्रेकर्सची सुटका, उर्वरितांच्या बचावासाठी बचावासाठी ८ हेलिकॉप्टर्स मैदानात video viral

Marathi News Live Updates: दुष्काळाने ऊसही कडू केला; दिवाळी तोंडावर असताना महिला शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, जनावरांच्या चाऱ्यासाठी उभा ऊस विकण्याची वेळ

Oppo K14 Plus 5G स्मार्टफोन लाँच; 144Hz AMOLED डिस्प्ले आणि 45W फास्ट चार्जिंगचा धुमाकूळ! पहा किंमत...

Childhood Cancer Symptoms : मुलाला येणारा ताप केवळ सामान्य ताप नसू शकतो; पालकांनी 'या' धोक्याच्या घंटा कधी ओळखाव्या? तज्ज्ञांनी दिला गंभीर आजाराचा इशारा

SCROLL FOR NEXT