Parshuram Ghat on Mumbai-Goa National Highway esakal
कोकण

Parshuram Ghat : कामात अडथळा ठरणारा परशुराम घाटातील 'कातळ' अखेर फोडला; चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील (Mumbai-Goa National Highway) परशुराम घाटात चौपदरीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

चिपळूण (Chiplun) हद्दीतील इगल इन्फ्रा कंपनीमार्फत बहुतांशी काम पूर्ण झाले असून, त्यांच्या हद्दीतील केवळ २७० मिटरचे काँक्रिटीकरण शिल्लक आहे.

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील (Mumbai-Goa National Highway) परशुराम घाटात चौपदरीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या कामात अडथळा निर्माण करणारा व घाटाच्या मध्यभागी असलेल्या कातळाचा बहुतांश भाग फोडण्यात यश आले. शिवाय, एका बाजूच्या काँक्रिटीकरणाची पूर्वतयारी पूर्ण झाली आहे.

तेव्हा पावसाळ्यापूर्वी दोन्ही लेनचे काम पूर्ण होणार, हे आता निश्चित झाले. ‘एमआयडीसी’च्या पाइपलाईनचे कामही पूर्ण झाले आहे. गेली अनेक वर्षे परशुराम घाटातील (Parshuram Ghat) चौपदरीकरण विविध कारणांमुळे वादग्रस्त ठरले. जमिनीचा मोबदला व मालकीवरून वाद निर्माण झाल्याने हे काम अडचणीत आले होते; मात्र आता घाटातील चौपदरीकरणाच्या कामाला वेग आला आहे.

चिपळूण (Chiplun) हद्दीतील इगल इन्फ्रा कंपनीमार्फत बहुतांशी काम पूर्ण झाले असून, त्यांच्या हद्दीतील केवळ २७० मिटरचे काँक्रिटीकरण शिल्लक आहे. एमआयडीसीची पाईपलाईन बदलण्यासाठी हे काम रखडले होते. मात्र, आता पाईपलाईनचे कामही पूर्ण झाले आहे. खेड हद्दीतील कल्याण टोलवेज कंपनीमार्फत सुरू असलेले काम एका अवघड वळणावर येऊन थांबले होते. या ठिकाणी २२ मीटरहून अधिक उंच दरडीचा भाग असल्याने व तेथे कठीण कातळ लागल्याने कामाचा वेग कमी झाला होता.

आता कातळ फोडण्याचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपल्याने त्या आधी घाटात चौपदरीकरणातील एकेरी मार्ग सुरू करण्यावर भर दिला आहे. त्याप्रमाणे कामाला गती मिळण्यासाठी २५ एप्रिलपासून दुपारी बारा ते सायंकाळी पाचदरम्यान घाटातील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.

या कालावधीत परशुराम घाटातील जुन्या मार्गावर भरावाचे काम पूर्ण केले. त्यानंतर आता काँक्रिटीकरणाचे कामही तातडीने हाती घेण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी मागील तीन दिवस सातत्याने सपाटीकरणाचे काम सुरू आहे. येत्या काही दिवसांत काँक्रिटीकरण पूर्ण करून पावसाळ्यापूर्वी घाटातील दोन्ही मार्ग वाहतुकीस खुले केले जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT