Rohan Mapuskar Found Face In Train For Advertising 
कोकण

राेहन मापुस्कर म्हणतो, जाहिरातीसाठी सापडला ट्रेनमध्ये चेहरा

सकाळवृत्तसेवा

चिपळूण ( रत्नागिरी ) - एका जाहिरातीसाठी आवश्‍यक असलेला वयोवृद्ध चेहरा मला लोकल ट्रेनमध्ये सापडला व मी तो त्या जाहिरातीसाठी काम करणाऱ्यांना दिला आणि तेथूनच खऱ्या अर्थाने माझ्या कास्टिंगच्या प्रवासाला सुरुवात झाली. मला घरातूनही काम करण्याची सवय आहे. त्यामुळे लॉकडाउनध्येही माझे कास्टिंगचे काम घरून सुरूच आहे, अशी माहिती कोकणशी नाते जपणारे आघाडीचे कास्टिंग डायरेक्‍टर रोहन मापुस्कर यांनी दिली. 

एका डिजिटल प्लॅटफार्मसाठी क्षमा देशपांडे यांनी मापुस्कर यांची मुलाखत घेतली. त्यावेळी ते म्हणाले की, श्रीवर्धनसारख्या खेडेगावातून सुरू झालेला व चित्रपटसृष्टीत सहाय्यक दिग्दर्शक, कास्टिंग डायरेक्‍टर म्हणून त्यांचा झालेला प्रवास उलगडला. माझा मोठा भाऊ राजेश मापुस्कर हा "राखण' या कार्यक्रमासाठी दरवर्षी गावाला येत असे. राखण म्हणजे कोकणातील जणू गेट-टुगेदर. राजेश दादाच्याकडून बॉलिवूडमधील गोष्टी ऐकताना या क्षेत्राविषयी आवड निर्माण झाली व त्यांचा हात धरून 2005-06 च्या दरम्यान मी मुंबईत आलो. राजकुमार हिरानी यांच्यासाठी काम करत असताना माझ्याकडे लोकेशन रेकीचे काम होते.

त्याचवेळी तनुप्रिया या नाटकाच्या निर्मितीबद्दल बोलताना ते म्हणाले की, डॉ. धर्मवीर भारती व मिताली जोशी यांनी हे नाटक मला ऐकवल्यानंतर मला ते इंटरेस्टिंग वाटले. त्या काळातील राधा व आताची राधा कशी असेल, असा विषय या नाटकातून मांडण्यात आला आहे. पुन्हा एकदा हे नाटक निर्माता म्हणून लोकांसमोर आणण्याचा माझा प्रयत्न असेल. 

दिग्दर्शक म्हणून आपलं नाव लागावं.. 
आपण कास्टिंग केलेले पाच ते सात मराठीसह इतर चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. आपल्याला दिग्दर्शन करायला आवडेल; पण सोबत कास्टिंगही सुरू राहील, असेही त्यांनी सांगितले व दिग्दर्शक म्हणून आपलं नाव लागावं, असं आपलं स्वप्न असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT