Untitled-1.jpg 
कोकण

रोहेकर उतरले रस्त्यावर; रॅली काढून नगरपलिकेला दिले निवेदन

पराग फुकणे

रोहा : ''कुंडलिकेच्या पात्रात माती भराव करु नका, नदीचे पात्र आरुंद करु नका, नदीच्या पावसाळी प्रवाहाला बाधित करणारा आणि धोकादायक असलेला माती भराव त्वरित काढून टाका'' ,यामागणी साठी रोहेकर सोमवारी रस्त्यावर उतरले होते. नदीचे पात्र वाचविण्यासाठी गावातून रॅली काढण्यात आली. यावेळी रोहा नगर पलिकेला कुंडलिका बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातुन दिडशेहून अधिक नागरिकांच्या सहयांचे निवेदन देण्यात आले आहे. 

रोहेकरांची जिवनदायिनी असलेल्या कुंडलिका नदीत संवर्धनाचे काम सूरु असुन त्यासाठी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात मातीचा भराव टाकुन आणि बांधकाम करुन नदीचे पात्र अरूंद केले जात आहे. परिणामी कुंडलिका नदीचे नैसर्गिक अस्तित्व धोक्यात आले आहे. पात्रात दोन्ही किनारी सिमेंटच्या भिंती तयार करण्याचे काम सुरू आहे. यामुळे नदीपात्र बंदिस्त होणार आहे. ही परिस्थिती पहाता नदीच्या प्रवाहात अडथळा निर्माण होईल असे कोणतेही काम करु नये. त्याच बरोबर पुररेषेत होत असलेल्या या भराव तातडीने थांबण्यात यावा तसेच पूररेषेत कोणतेही नियमबाहय बांधकाम करु नये या मागणीसाठी रोहेकरांनी शहरातील राम मारुती चौक ते रोहा नगर परिषद दरम्यान भव्य रॅली काढली.

या रॅलीचे नेतृत्व ज्येष्ठ पत्रकार दिलिप वडके, सामाजिक कार्यकर्ते अप्पा देशमुख, अ‍ॅड. मनोजकुमार शिंदे, संतोष खटावकर, सुरेश मगर, राजेंद्र जाधव, अ‍ॅड. हर्षद साळवी यांनी केले. तर माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, संदीप तटकरे, आदिंनी उपस्थित राहुन या लोक चळवळीस सक्रिय पाठिंबा दर्शविला. नगर पालिकेच्या आवारात येताच रॅलीचे सभेत रूपांतर झाले. यावेळी अ‍ॅड. मनोजकुमार शिंदे, सुरेश मगर, समीर शेडगे, संदीप तटकरे, राजेंद्र जाधव आदिंनी उपस्थितांना संबोधित केले. यारॅलीमध्ये दोनशेहून अधिक नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. रोहयाचे मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांनी रॅलीला सामोरे जात निवेदन स्विकारले. तसेच निवेदनाचा सर्वकषपणे विचार करुन आपल्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi MPSC Students Protest : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राहुल गांधींचा पाठिंबा; म्हणाले, ‘आश्वासने नकोत, ठोस कारवाई हवी’

Nagpur News : विमानासाठी गेट उघडताना काळाचा घाला! लोखंडी गेट अंगावर कोसळून सुरक्षा रक्षकाचा मृत्यू; दुसरा गंभीर

Kaygaon News : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अमळनेर येथे ‘आजी-आजोबा दिन’ उत्साहात साजरा

Velhe News : गुंजवणी प्रकल्पाच्या सुधारित जलनियोजनाला शासनाची मान्यता; वाजेघर, वांगणी व शिवगंगा खोऱ्यातील सिंचनाला मिळणार गती

MVA Legislative Council : विधानपरिषदेवरून महाविकास आघाडीत एकमत नाही, काँग्रेस, ठाकरे गटात ठिणगी पडली

SCROLL FOR NEXT