Role Of Baban Salgaonkar Regarding Multi Specialty Hospital
Role Of Baban Salgaonkar Regarding Multi Specialty Hospital 
कोकण

खासदार राऊत यांची `ही` भूमिका हस्यास्पद; माजी नगराध्यक्षांची टीका

सकाळवृत्तसेवा

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - शहरासाठी एका पैशाचे योगदान नसणारे खासदार विनायक राऊत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल शहराबाहेर नेण्यासाठी सर्व ताकत लावत आहेत. मुळात मोफत जागा मागणे हेच हास्यास्पद असुन खासदार राऊत व पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा नियोजनमधून यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. विनामोबदला जागेअभावी जर हॉस्पिटल शहराबाहेर जात असेल तर प्रसंगी लढा उभारावा लागेल, असा इशारा माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे दिला. 

श्री. साळगावकर यांनी येथे पत्रकार परिषद घेत मल्टीस्पेशालिटीबाबत भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले ""मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलवरून खासदार राऊत यांनी जागा उपलब्ध न झाल्यास दुर्दैवाने हॉस्पिटल नेरूर (ता. कुडाळ) याठिकाणी हलवावे लागेल, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्यानंतर हॉस्पिटलबाबत एक प्रकारे येथील जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यानंतर जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी विनामोबदला जागा मिळाल्यास शहरातच हॉस्पिटल उभे करू असे सांगितले. खासदार राऊत व श्री. पडते या दोघांची वक्तव्य पाहता संशयास्पद आहेत. मुळात श्री. राऊत यांनी हॉस्पिटल नेरुर येथे नेणे असे म्हणण्यापेक्षा जागा उपलब्ध न झाल्यास दुसरी पाहू असे म्हणणे योग्य ठरले असते. गेल्या सहा वर्षात श्री. राऊत यांचे शहरासाठी एका पैशाचे योगदान नाही. अशात आता शहरात मंजूर हॉस्पिटल शहराबाहेर नेण्यासाठी सर्व ताकत वापरत आहेत. त्यामुळे एकूणच सावंतवाडी शहरांमध्ये यावरून असंतोष निर्माण झाला आहे.'' 

शहर विकास आराखडा अंतिम टप्प्यात आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांची सही होण्यासाठी स्थानिक आमदारांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही श्री. साळगावकर यांनी केले. 

""शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शहराच्या आसपास व्हावे, अशी आमची मागणी होती; परंतु ते जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी होण्याची शक्‍यता आहे. ते ठिक आहे; मात्र सिंधुदुर्ग, रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्याचा विचार करून ते जिल्ह्याच्या टोकाला खारेपाटण येथे गेल्यास चुकीचे ठरेल. त्याबदल्यात वेत्ये येथील जागेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारावे; मात्र शहरात मंजूर व भूमिपूजन झालेले मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल शहराबाहेर जात असल्यास प्रसंगी ताकतीने लढा उभारावा लागेल.'' 
- बबन साळगावकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Latest Marathi News Update : करकरेंविषयी वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा; शशी थरूरांची मागणी

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

Skin Care : त्वचाविकार कधी येणार गरिबांच्या आवाक्यात ; मेडिकलला तीन वर्षांपासून ‘फ्रॅक्शनल सीओटू’ लेझर यंत्राची प्रतीक्षा

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

SCROLL FOR NEXT