Ronal Gram Panchayat's appeal regarding workers in Mumbai and pune 
कोकण

गावात येणाऱ्यांसाठी रोणापालची नियमावली तयार...काय आहे आवाहन?

निलेश मोरजकर

बांदा (सिंधुदुर्ग) - गणेश चतुर्थीच्या निमित्ताने जिल्ह्याच्या बाहेरून रोणापाल गावात येणाऱ्यांना 7 ऑगस्टपूर्वी येण्याचे आवाहन केले आहे. जिल्हा व स्थानिक प्रशासनाने कोरोना काळात घेतलेल्या काळजीमुळेच आज गावात कोरोनाचा शिरकाव होऊ शकला नाही. त्यामुळे शासनाचे नियम बाजूला ठेवून स्थानिक ग्राम कृती दलाने घेतलेलेच निर्णय सर्वांना मान्य करावे लागतील, असा एकमुखी निर्णय ग्राम कृती दल समिती व रोणापाल ग्रामस्थांनी घेतला. 

गणेशोत्सव पार्श्‍वभूमीवर रोणापाल ग्रामपंचायत सभागृहात आयोजित बैठकीत ग्राम कृती दल समिती अध्यक्ष तथा सरपंच सुरेश गावडे, उपसरपंच पप्या केणी, तंटामुक्ती समिती अध्यक्ष प्रकाश गावडे, माजी अध्यक्ष बाबल तुयकेर, सहकारी विकास संस्था माजी चेअमरमन अशोक कुबल, माजी सरपंच उदय देऊलकर, स्वयंसेवक बाबु गावडे, निवृत्त शिक्षक विष्णू सावंत, माजी ग्रामपंचायत सदस्य मंगेश गावडे, कर्मचारी बाळू देऊलकर, ग्राम कृती समितीचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ कृष्णा परब, सदाशिव गाड, बाबा गावडे, बाळू तोरसकर आदी उपस्थित होते. दरम्यान, बारावी इयत्तेत खेमराज मेमोरियलमध्ये शिकणाऱ्या ओमकार गावडे याने 77.85 टक्के मिळून तिसरा क्रमांक पटकाविल्याबद्दल गावाच्यावतीने सरपंच सुरेश गावडे यांनी अभिनंदन केले. 

नियमावली जाहीर 
नियमावलीत म्हटले आहे, की 14 दिवस संस्थात्मक क्‍वॉरंटाईन बंधनकारक, अत्यावश्‍यक सेवा बजावणाऱ्यांनी सुरक्षितता बाळगावी, 7 ऑगस्टनंतर चाकरमान्यांनी येऊ नये, संस्थात्मक विलगीकरणाचे दिवस पूर्ण होण्याआधी तीन दिवस आरोग्य विभागाने क्‍वारंटाईन असलेल्यांची तपासणी करावी, नातेवाईकांना चतुर्थीला न येण्याचे आवाहन करावे, वाडीतील भजनी मंडळांनी दुसऱ्या वाडीत भजनासाठी जावू नये, ध्वनीक्षेप करू नये, गावाच्या सुरक्षिततेसाठी शासनाच्या नियमावर बोट न ठेवणे असे अनेक नियम तयार केले आहेत. 
 

संपादन ः राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठी 'खेळी'! ठाकरे गटातील खासदार शिंदेसेनेत येणार? एकनाथ शिंदेंची दिल्लीत गुप्त रणनीती

सुरज चव्हाण होणार बाबा? बायकोच्या 'त्या' पोस्टने वेधलं सगळ्यांचं लक्ष, Viral Video

120000000000! राजस्थान रॉयल्स फ्रँचायझी विकणे आहे; भारताची मोठी कंपनी तगडी रक्कम मोजून बनणार मालक, ४ स्पर्धक शर्यतीत

Latest Marathi News Live Update : पंढरपूर येथील सांगोला पेपर चोरी प्रकरण; दोन विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

Pune Rain: पुण्यात पावसाला सुरुवात! कोथरुड, बाणेर भागात ढगांचा गडगडाट; हवामान विभागाचा अलर्ट

SCROLL FOR NEXT