Chipi Airport esakal
कोकण

वायुसेनेच्या विमानाकडून चिपीमध्ये धावपट्टीची चाचणी? विमानतळावर घिरट्या अन् खोल समुद्राच्या दिशेने विमान मार्गस्थ

सिंधुदूर्ग किल्ल्यावर ४ डिसेंबरला नौसेना दिन साजरा होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

वायुसेनेच्या विमानाने चिपी विमानतळाच्या रेन-वेची हवाई पाहणी केली असल्याचे सांगण्यात आले.

कुडाळ : सिंधुदुर्ग (चिपी) विमानतळावर (Chipi Airport) काल सकाळी अकरा वाजता एक विमान उतरले. त्या विमानाने सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास चिपी विमानतळाच्या धावपट्टीवरून उड्डाण घेत विमानतळावर एक घिरटी घातली. त्यानंतर ते विमान खोल समुद्राच्या दिशेने मार्गस्थ झाले.

काही वेळातच परत ते विमान माघारी येत विमानतळाच्या धावपट्टीवर काही वेळ स्थिरावत गोव्याच्या दिशेने रवाना झाले. हे विमान वायुसेनेचे असल्याचे सांगण्यात आले. ४ डिसेंबरला नौसेना दिनाच्या (Navy Day) पार्श्वभूमीवर चिपी विमानतळाच्या धावपट्टीची चाचणी, तसेच नाईट लॅन्डिंग यंत्रणेची चाचणी घेण्यासाठी ते विमान आले असल्याचे सांगण्यात आले.

सिंधुदूर्ग किल्ल्यावर ४ डिसेंबरला नौसेना दिन साजरा होणार आहे. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्म, पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रमुख व्यक्तींसह अनेक मान्यवर मंडळी या कार्यक्रमासाठी सिंधुदुर्गात दाखल होणार आहेत. त्या पार्श्वभुमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्याची प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. त्यासाठी चिपी विमानतळावरील यंत्रणा कार्यान्वित केली असून नाईट लॅन्डिंग सुविधाही बसविली आहे. परिणामी, रात्रीची विमाने उतरविणे व उडाण घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डिजीसीए) ची परवानगी मिळणे क्रमप्राप्त आहे. डिजीसीएचे पथक लवकरच चिपी विमानतळावरील नाईट लॅन्डिंग सुविधेची पाहणी करून हिरवा दिवा देणार आहे. त्यानंतर प्रत्यक्षात नाईट लँन्डिंग विमानसेवा सुरू होईल. त्या पार्श्वभुमीवरच वायुसेनेच्या विमानाने आज चिपी विमानतळाच्या रेन-वेची हवाई पाहणी केली असल्याचे सांगण्यात आले. याबाबत चिपी विमानतळाच्या यंत्रणेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Pune Metro: पुणेकरांना मोठा दिलासा! विमानतळाला मेट्रोची थेट जोडणी, कर्वे रस्त्यावर दुमजली उड्डाणपूल; मोहोळ यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT