Russia Ukraine war update family is emotional with arrival of Rishabhnath chiplun
Russia Ukraine war update family is emotional with arrival of Rishabhnath chiplun sakal
कोकण

ऋषभनाथच्या आगमनाने कुुटुंब भावूक

- नागेश पाटील

चिपळूण : युक्रेनवर ताबा मिळण्यासाठी रशियाने हल्ले करण्यास सुरुवात केल्यावर आम्ही घाबरलोच. युक्रेनमध्येच उजक्रोड इंटरनॅशनल युनिर्व्हसिटी हंगेरी सीमेलगत असल्याने तिथे फारसा धोका नव्हता. विद्यापीठापासून २० किलोमीटरवर सीमारेषा होती. त्यामुळे धोका वाढल्यावर शेजारच्या हंगेरी देशात त्वरित स्थलांतराचे नियोजन विद्यापीठाने केले होते. ऐनवेळी हल्ला झाल्यास बंकरमध्ये राहण्याची व्यवस्था होती. तिथे असतानाच तीन दिवस संचारबंदी होती, अशी माहिती ऋषभनाथ मोळाज याने दिली. तो युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेतो. मुलगा घरी सुखरूप परतल्याने ऋषभनाथच्या आई-वडील व बहिणीच्या चेहऱ्यांवर आनंद ओसंडून वाहत होता. दरम्यान, ऋषभनाथ हा आज घरी आल्याने महाशिवरात्रीचा योग साधता आल्याची भावना पालकांनी व्यक्त केली.

डिसेंबर २०२१ मध्ये त्याने युक्रेन येथे एमबीबीएसच्या पहिल्या वर्षासाठी प्रवेश घेतला. उजक्रोड विद्यापीठात सुमारे १९ हजार भारतीय वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. विद्यापीठाने भारतीय विद्यार्थ्यांसह सर्व विद्यार्थ्यांचीच काळजी घेतली होती. भारतीय दुतावासाचे मोठे सहकार्य लाभल्याने मी सुरक्षित आणि सुखरूप घरी पोहोचलो, अशी भावना खेर्डी येथील ऋषभनाथ मोळाज याने व्यक्त केली. राजेंद्र मोळाज हे मुळचे सांगली जिल्ह्यातील ब्रह्मणाळचे. ते गेली २५ वर्षापासून खेर्डी येथे वास्तव्यास आहेत. मुलगा ऋषभनाथ व मुलगी वैदेही ही दोन अपत्ये. पत्नी अर्चना या गृहिणी आहेत; तर मोळाज हे दादर प्राथमिक आरोग्य केंद्रात सुपरव्हायझर म्हणून नोकरीस आहेत.

दरम्यान, भारतीय दुतावासाकडून भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याचा निर्णय झाल्यावर काहीशी चिंता मिटली होती. कुटुंबीय आणि नातेवाईक सारखे संपर्कात असायचे. वास्तव्याच्या ठिकाणी वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण कमी होते. युक्रेन येथे चांगले वैद्यकीय शिक्षण मिळते. मी पुन्हा तिकडे शिक्षणासाठी जाणार आहे. परतीचा प्रवास उजक्रोड बुडापेस्ट हंगेरीमार्गे दिल्लीपर्यंत झाला. दिल्लीतून मुंबई व मुंबईतून चिपळूणला आज पहाटे पाचला पोचलो. त्यामुळे कुटुंबाने आनंद व्यक्त केला. हल्ले ३०० कि.मी.वर; आम्ही होतो सुरक्षित युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ऋषभनाथ म्हणाला, की युक्रेन-रशियाचे वाद गेल्या काही वर्षांपासून सुरू आहेत.

युक्रेनचा विकासदर रशियाच्या कितीतरी पटींनी अधिक असून, तो विकसित देश आहे. २२ फेब्रुवारीला युक्रेनवर हल्ला करण्यास सुरुवात झाली. विमानतळ, रेल्वेस्थानक तसेच तेथील राष्ट्रीय प्रकल्पावर बॉम्बहल्ले, तोफगोळे फेकले. त्या वेळी आमच्या परिसरात सायरन वाजवून कर्फ्यू लावला होता. मात्र, हे हल्ले ३०० किलोमीटरवर होत असल्याने आम्ही सुरक्षित होतो, असेही ऋषभनाथ याने स्पष्ट केले. रशियाने युक्रेनवर हल्ले करण्यास सुरुवात केल्यावर कुटुंबीयांची धाकधूक खूप वाढली होती. मुलगा कधी एकदा घरात येतोय, हे विचार मनात असायचे. वारंवार त्याच्या संपर्कात होतो. मित्रमंडळी, नातेवाईक, प्रशासन व भारतीय दूतावासांचे मोलाचे सहकार्य मिळाले. -राजेंद्र मोळाज, पालक, खेर्डी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: 48 तासांत मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यावर सुनावणी, कोर्टाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावून उत्तर मागितले

Gurucharan Singh: बेपत्ता झालेला गुरुचरण सिंग अखेर घरी परतला; म्हणाला, "मी धार्मिक प्रवासाला निघालो होतो..."

Stock Market: 20 मे रोजी मुंबईतील लोकसभा मतदानामुळे शेअर बाजार बंद राहणार का?

IPL 2024 MI vs LSG : मुंबई संघाच्या गोलंदाजीची दुर्दशा कायम;निकोलस पूरनच्या झंझावाती फलंदाजीमुळे लखनौच्या २१४ धावा

Latest Marathi News Live Update : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरला बसची धडक 25 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT